घरताज्या घडामोडीउद्यापासून या सरकारला जुम्मे के जुम्मे सरकार म्हणायचं, पाणी टंचाईवरुन रावसाहेब दानवेंचा...

उद्यापासून या सरकारला जुम्मे के जुम्मे सरकार म्हणायचं, पाणी टंचाईवरुन रावसाहेब दानवेंचा आक्रोश

Subscribe

औरंगाबाद (Aurangabad) शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवरून भाजपकडून (Bjp Jal Aakrosh Morcha)  आज भव्य असा जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील (Raosaheb Danve Patil) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanavis ) यांनी जनतेला संबोधित करताना महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्यापासून या सरकारला जुम्मे के जुम्मे सरकार असं म्हणायचं, महाविकास आघाडीचं सरकार म्हणायचं नाही. कारण हे सरकार अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार आहे, अशी टीका  रावसाहेब दानवे पाटील यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केली आहे.

उद्यापासून या सरकारला जुम्मे के जुम्मे सरकार म्हणायचं

हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार नाही. यांचं आज आपण नामांतर करून टाकू. या सरकारचा नाव जुम्मे के जुम्मे सरकार, उद्यापासून या सरकारला जुम्मे के जुम्मे सरकार असं म्हणायचं, महाविकास आघाडीचं सरकार म्हणायचं नाही. कारण हे सरकार अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार आहे. हे सरकार कधीच एकत्र बसून कोणताच ठाम निर्णय घेत नाहीत. त्यामुळे हे सरकार राज्यातील कोणतेही प्रश्न सोडवू शकत नाहीत. जे आपल्याला जमत नाही, त्याचं खापर ते केंद्र सरकारवर फोडल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे हे जुम्मचे सरकार आहे.

- Advertisement -

१६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यासंदर्भात माहिती सांगण्याची गरज तुम्हाला नाही. समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. परंतु ही पाणीपुरवठा योजना यांच्या भानगडीमुळे बंद झाली. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना आमचे मंत्री अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांनी १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. सरकार बदललं आणि असंगाशी संगत केली. युती भाजप आणि सेनेची होती. तसेच लोकांनी आम्हाला मतं दिली. परंतु आमचे मतं चोरीला गेले. चोर सापडला असून चोरला शिक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात द्यायची आहे.

मुख्यमंत्री घरात आणि आम्ही तुमच्या दारात…

या सरकारचे दोन मंत्री तुरूंगात आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या घरात आहेत. कोविडच्या काळात सुद्धा भाजपाने अनेकांची मदत केली. कोरोनाच्या काळात भाजपच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पण राज्याच्या मुख्यमंत्री बाहेर पडला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी दिली होती. जेव्हा आमचे लोकं रस्त्यावर आणि पाण्यावर गेलेत, तसेच शेतकऱ्यांमध्ये गेले आहेत. तेव्हा फडणवीसांनी सांगितलं होतं, मुख्यमंत्री घरात आणि आम्ही तुमच्या दारात. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोलापूर दौरा केला.

- Advertisement -

तुम्ही जबाबदारीपासून पळ काढता

सोलापूर दौऱ्यानंतर मुख्यमंत्री पुढील जिल्ह्यात गेले. तेव्हा डॉक्टर आणि प्राध्यापक सर्व एकत्र आले. त्यांनी सांगितलं केंद्राने पॅकेज दिलं. राज्याचा पॅकेज जाहीर करा. तेव्हा त्यांनी सांगितलं की, माझे कुटुंब माझी जबाबदारी…तुम्ही जबाबदारीपासून पळ काढता. त्यामुळे कोणतीही गोष्ट तुमच्याकडून होत नाही. त्यानंतर त्याचं खापर केंद्रावर फोडता. कोविडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला मदत केली. या देशातील १३० कोटी लोकांना मोफत लस पुरवली. तसेच त्यांनी धान्य पुरवलं, असं दानवे म्हणाले.


हेही वाचा : शिवबंधन बांधायचे तर राजेंना राऊतांची सेफ जागा द्या – रावसाहेब दानवे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -