घरमुंबई'बेस्ट'चा प्रवास स्वस्त, तर टॅक्सीचा प्रवास महागणार?

‘बेस्ट’चा प्रवास स्वस्त, तर टॅक्सीचा प्रवास महागणार?

Subscribe

कोट्यवधींच्या कर्जात आणि तोट्याच्या गाळात अडकलेला बेस्ट उपक्रम नव्या जोमाने मुंबईकरांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. तिकीट दर कमी करण्याचा निर्धार बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

कोट्यवधींच्या कर्जात आणि तोट्याच्या गाळात अडकलेला बेस्ट उपक्रम नव्या जोमाने मुंबईकरांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. येत्या काही महिन्यांत बेस्ट बसचा ताफा दुपटीने वाढणार असतानाच तिकीट दर कमी करण्याचा निर्धार बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. पहिल्या पाच किमीपर्यंतच्या प्रवासासाठी आता पाच रुपये मोजावे लागणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत या नव्या प्रवास दराला मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नवीन दर लवकर लागू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या बेस्टचे २ किमी अंतरासाठीचे किमान तिकीट ८ रुपये असून मागील काही वर्षांत उत्पन्न वाढीसाठी आणि वाढत्या खर्चांचा मेळ घालण्यासाठी बेस्टच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. मात्र, आता हा दर कमी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता एसी बसच्या पहिल्या टप्प्यासाठीही केवळ ६ रुपये तिकीट आकारले जाणार आहे. बेस्टचा प्रवास स्वस्त होण्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मात्र, टॅक्सीचे भाडे वाढणार आहे. सध्या टॅक्सीचे भाडे २२ रुपय असून आता हे भाडे २७ रुपये होणार आहे. ही भाडेवाढ करण्यासाठी परिवहन विभाग सज्ज होत आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियन आणि राज्य सरकार यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन सचिव आणि परिवहन विभाग यांना एका आठवड्यात भाडेवाढी संबंधित निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

यासाठी घेण्यात आला हा निर्णय

मुंबईत ठिकठिकाणी प्रवासी मोठ्या प्रमाणात शेअर टॅक्सी, रिक्षा यांचा वापर करतात. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते. त्याचप्रमाणे रिक्षा टॅक्सी यांच्यामुळे बेस्टकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात बेस्ट तोट्यात गेली असून त्यात वाढ होत आहे. प्रवाशांचा ओढा पुन्हा एकदा बेस्टकडे वळवण्यासाठी बसचे दर कमी करण्याची मागणी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येत होती. या मागणीकडे आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

असा असणार दर

नव्या प्रस्तावानुसार, पाच किमीपर्यंतच्या प्रवासासाठी पाच रुपयांचे तिकीट असणार आहे. त्यानंतर १० किमीसाठी १० रुपये, १५ किमीपर्यंतच्या अंतरासाठी १५ रुपये आणि १५ किमीपुढील अंतरासाठी २० रुपये तिकीट दर असणार आहेत. तर, दैनिक पास ५० रुपयांना असणार आहे. वातानुकूलित बसचे दरही कमी ठेवण्यात येणार आहेत. वातानुकूलित बसचे तिकीट पाच किमीपर्यंतच्या अंतरासाठी ६ रुपये, १० किमीपर्यंतच्या अंतरासाठी १३ रुपये, १५ किमीपर्यंतच्या अंतरासाठी १९ रुपये आणि १५ किमीपुढील अंतरासाठी २५ रुपये तिकीट दर असतील. तर, दैनंदिन पास ६० रुपयांना असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आज घेण्यात येणार बेस्ट समितीची मंजुरी

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्ट दरात कपातीचे संकेत दिले होते. त्यानंतर काही महापालिकेने बेस्टला आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव देखील मंजुर केला होता. या प्रस्तावावर आज, शुक्रवारी बेस्ट समितीची मंजुरी घेण्यात येणार असून बेस्टच्या प्रवास दराच्या कपातीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बेस्टला १०० कोटी दरमहा  मिळणार

हेही वाचा – ‘बेस्ट’च्या कल्याणासाठी..


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -