घरताज्या घडामोडीरस्त्यांवरील खड्ड्यांसाठी महापालिका, एमएमआरडीएचे WhatsApp नंबर जारी

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी महापालिका, एमएमआरडीएचे WhatsApp नंबर जारी

Subscribe

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस (Heavy Rainfall) झाल्यास मुंबईची तुंबई होते. तसेच, मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवर खड्ड्यांचे (Potholes) साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे मुंबईची रस्ते वाहतूक (Road Transport) ठप्प होते. परिणामी महापालिकेवर टीका केली जाते.

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस (Heavy Rainfall) झाल्यास मुंबईची तुंबई होते. तसेच, मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवर खड्ड्यांचे (Potholes) साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे मुंबईची रस्ते वाहतूक (Road Transport) ठप्प होते. परिणामी महापालिकेवर टीका केली जाते. मात्र, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पाणी साचणार नाही रस्ते वाहतूक थांबणार नाही. शिवाय खड्डे बुजवण्याचे कामही पूर्ण झाले यांसारखे अनेक दावे महापालिकेकडून केले जातात. परंतु, पावसाळ्यात आणि नंतरच्या काळाता परिस्थिती जशास तशी पाहायला मिळते. त्यामुळे महापालिकेने यंदा मुंबईकरांना खड्ड्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी नवी योजना आखली आहे. महापालिकेने व्हॉट्सअॅप नंबर (BMC WhatsApp Numbers) जारी केले आहेत. याशिवाय यंदा एमएमआरडीएनेही मुंबईकरांच्या मदतीसाठी व्हॉट्सअॅप नंबर (MMRDA Whatsapp Numbers) जारी केले आहेत. त्यामुळे महापालिका आणि एमएमआरडीएच्या या नव्या योजनेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (BMC and MMRDA launched whatsapp numbers for potholes issue)

मोबाइल अॅपवर खड्ड्यांच्या फोटोसह तक्रार

- Advertisement -

मुंबईकरांना मोबाइल अॅपवर खड्ड्यांच्या फोटोसह तक्रार करता येणार आहे. शिवाय महापालिकेने ४८ तासांत खड्डे बुजवण्याची ग्वाही दिली. @mybmc वर ट्वीट करता येईल किंवा mcgm.gov.in या वेबसाइटवर तक्रार करता येईल. तसेच MCGM 24×7 हे अॅप सुरू केले असून, ते तुम्हाला प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे.

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी १८००२२१२९३ हा टोल फ्री क्रमांक आहे. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील १९१६ या क्रमांकासह व्हॅटसअॅप चॅटबोटवरही तक्रार करता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महानगरपालिका निवडणुकांसाठी २३ जूनला मतदारयाद्या प्रसिद्ध होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने खड्ड्यांच्या तक्रारींसाठी यंत्रणा सज्ज केली आहे. यावेळी महापालिकेला एमएमआरडीएने साथ दिली असून, या दोन यंत्रणा समन्वय साधून खड्डे बुजवणार आहेत. महापालिकेच्‍या अखत्‍यारितील रस्‍त्‍यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. मेट्रोच्या कामांमुळेही खड्डे आणि चर पडण्याच्या तक्रारी नोंद होत असतात.

व्हॉटसअॅप नंबर प्रसिद्ध

मुंबईत २५.३३ किमी लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, २५.५५ किमी लांबीचा पूर्व द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील रस्‍ते हे एमएमआरडीएच्या अखत्‍यारित येतात. त्यासाठी यंदा प्रथमच एमएमआरडीएच्या २६ अधिकाऱ्यांचे व्हॉटसअॅप नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विविध वॉर्डात मोठ्या अक्षरात बॅनर/फ्लेक्स/ बोर्ड प्रदर्शित केले जाणार आहेत. यावर दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असणार आहेत.

यंदाही कोल्डमिक्सचा वापर

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यंदाही कोल्डमिक्सचा वापर केला जाणार आहे. यंदा तब्बल ३ हजार मेट्रिक टन कोल्डमिक्स तयार केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २४ विभागांमध्ये १,३२५ मेट्रिक टन कोल्डमिक्सचे वाटप करण्यात आले.

२४ विभागांकडून ३०९९ मेट्रिक टन कोल्डमिक्सची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार सुमारे ७० टक्के कोल्ड मिक्सचे वितरण पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर पावसाळ्यात मागणीनुसार व विभागांच्या साठवणूक क्षमतेनुसार वितरण करण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

  • मुंबईत एकूण रस्ते : २५०० किमी
  • महापालिकेच्या अखत्यारीत : २०५५ किमी
  • एमएमआरडीएकडे : ५५ किमी

एमएमआरडीए व्हॉट्सअॅप नंबर

  • ८६५७४०२०९०
  • टोल फ्री क्रमांक १८००२२८८०१
  • ०२२-२६५९१२४१
  • ०२२-२६५९४१७६

महापालिका अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप नंबर

  • कुलाबा ए ८८७९६५७६९८
  • सँडर्हस्ट रोड बी ८८७९६५७७२४
  • चंदनवाडी सी ८८७९६५७७०४
  • ग्रँट रोड डी ८८७९६५७६९४
  • भायखळा ई ८८७९६५७७१२
  • एफ-उत्तर ८८७९६५७७१७
  • परळ एफ-दक्षिण ८८७९६५७६७८
  • दादर जी-उत्तर ८८७९६५७६८३/७७५८
  • वरळी जी-दक्षिण ८८७९६५७६९३
  • वांद्रे एच-पूर्व ८८७९६५७६७१
  • वांद्रे एच-पश्चिम ८८७९६५७६३३
  • अंधेरी के-पूर्व ८८७९६५७६५१
  • अंधेरी के-पश्चिम ८८७९६५७६४९
  • गोरेगाव पी-दक्षिण ८८७९६५७६६१
  • मालाड पी-उत्तर ८८७९६५७६५४
  • कांदिवली आर-दक्षिण ८८७९६५७६५६
  • बोरीवली आर-उत्तर ८८७९६५७६३६
  • दहिसर आर-मध्य ८८७९६५७६३४
  • कुर्ला एल ८८७९६५७६२२/१०/१४
  • चेंबूर एम-पूर्व ८८७९६५७६१५
  • चेंबूर एम-पश्चिम ८८७९६५७६०८/०२/१२
  • घाटकोपर एन ८८७९६५७६१७/०५
  • विक्रोळी एस ८८७९६५७६०३/११
  • मुलुंड टी ८८७९६५७६०९

हेही वाचा – तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा, खासदार उदयनराजेंचं अजित पवारांना आव्हान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -