घरताज्या घडामोडीमुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह वैधानिक समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह वैधानिक समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर

Subscribe

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसह चार वैधानिक समित्यांच्या निवृत्त झालेल्या सदस्यांच्या रिक्त जागी नवीन सर्व पक्षांच्यावतीने सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांच्या नावांची घोषणा महापालिकेच्या सभेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे ज्या स्थायी समितीमध्ये शिवसेनेच्यावतीने नवीन आणि तरुण नगरसेवकांची वर्णी लावली जाणार, असे बोलले जात होते. तिथे एकमेव बदल करत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची वर्णी लावण्यात आली आहे. तर भाजपने स्थायी समितीत आपली आक्रमकता वाढवण्यासाठी नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांना प्रभाकर शिंदे यांच्या जोडीला पाठवले आहे. मात्र, शिक्षण आणि सुधार समितीत शिवसेना आणि भाजपने कोणतेही फारसे बदल न करता यापूर्वी निवृत्त झालेल्या सदस्यांनाच पुन्हा संधी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका येत्या ५ ऑक्टोबरपासून होत असून या समितीवरील काही निवृत्त सदस्यांच्या रिक्तजागी नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा सोमवारी महापालिका सभागृहात करण्यात आली आहे. स्थायी समितीमध्ये शिवसेनेने सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि राजुल पटेल यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. तर सुजाता सानप यांच्या जागी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची वर्णी लावली आहे. तर भाजपच्यावतीने खासदार मनोज कोटक, डॉ. राम बारोट, गीता गवळी व पराग शाह यांच्या जागी आशा मराठे, हरिष भांदिर्गे, उज्ज्वला मोडक व भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. तर राजेश्री शिरवाडकर, मकरंद नार्वेकर आणि विद्यार्थी सिंह यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या यासर्व सदस्यांची बाजू आता यासर्व सदस्यांना पाहता आक्रमक झाली असून यासर्वांची तोफांचा मारा सांभाळून आक्रमण करणारा मावळ्यालाच पुन्हा अध्यक्षपदी बसवण्याशिवाय शिवसेनेकडे पर्याय उरत नाही.

- Advertisement -

शिक्षण समितीत शिवसेनेने कोणताही बदल केला तर भाजपने योगिता कोळी या नवीन सदस्याची नियुक्ती केली आहे. तर सुधार समितीतही फारसा बदल नसून शिवसेने सर्व निवृत्त सदस्यांना कायम ठेवले आहे. तर भाजपने पुन्हा एकदा या समितीवर सुनील यादव यांना संधी दिली आहे. तर बेस्ट समितीमध्ये राजीनामा मागून घेण्यात आलेल्या गणेश खणकर यांना बेस्ट समितीवर पाठवण्यात आले आहे. याशिवाय राणे समर्थक राजेश हाटले यांनाही संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेने आपल्या सर्व सदस्यांना कायम ठेवले आहे.

समित्यांमध्ये नव्याने नियुक्त झालेले शिवसेनेचे सदस्य

शिक्षण समिती

- Advertisement -

शिवसेना : स्नेहल आंबेकर, शुभदा गुढेकर, संध्या दोषी, मंगेश सातमकर, राहुल कनाल (बिगर सदस्य)

भाजप : योगिता कोळी, श्रीकला पिल्ले, नेहल शाह, प्रतिक कर्पे (बिगर सदस्य)

काँग्रेस : संगिता हंडोरे, विन्निफ्रेड डिसोझा

राष्ट्रवादी काँग्रेस : डॉ. सईदा खान

स्थायी समिती

शिवसेना : विश्वनाथ महाडेश्वर, राजुल पटेल, विशाखा राऊत, (सुजाता सानपच्या रिक्त जागी)

भाजप : उज्ज्वला मोडक, आशा मराठे, भालचंद्र शिरसाट, हरिश भांदिर्गे, कमलेश यादव, मकरंद नार्वेकर, राजेश्री शिरवडकर, विद्यार्थी सिंग

काँग्रेस : रवी राजा

राष्ट्रवादी काँग्रेस : राखी जाधव

सुधार समिती

शिवसेना : समृध्दी काते, श्रध्दा जाधव, अनंत नर, राजू पेडणेकर, श्रीकांत शेट्ये, चित्रा सांगळे,

भाजप : सुनिल यादव, विनोद मिश्रा, सागरसिंह ठाकूर, हरिष छेडा

काँग्रेस : कमरजहाँ सिद्दीकी

राष्ट्रवादी काँग्रेस : मनिषा रहाटे

समाजवादी पक्ष : रुक्साना सिद्दीकी


बेस्ट समिती

शिवसेना :आशिष चेंबूरकर,अनिल कोकिळ,अनिल पाटणकर

भाजप : गणेश खणकर, अरविंद कागिनकर, राजेश हाटले

काँग्रेस : रवी राजा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -