BMC Budget 2021: पालिका शाळांमध्ये आता टिकरींग लॅब, तर २४ शाळांमध्ये सुरू होणार संगीत केंद्र

लोअर परेल येथील एन.एम.जोशी मार्ग महापालिकेच्या शाळेमध्ये साऊंडप्रुफ हॉल तयार केला जाणार

Holidays to schools in the Maharashtra till June 13

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या (BMC Budget 2021) सुरुवातीला शिक्षण विभागाचे बजेट जाहीर करण्यात आला आहे. सह आयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना शिक्षण खात्याचा सन२०२१-२२ चा अर्थसंकल्प दुपारी १२.२० वाजता सादर केला. शिक्षण विभागासाठी २,९४५ कोटींचे बजेट जाहीर झाले. दरम्यान मुंबई महापालिका इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ माध्यमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणाऱ्या टिंकरींग लॅब (विचारशील प्रयोगशाळा) संदर्भात तरतूद जाहीर करण्यात आली. यामध्ये प्राथमिकसाठी २.६५ कोटी रुपये आणि माध्यमिकसाठी २.६५ कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

२४ शाळांमध्ये संगीत केंद्र सुरू करणार

मुंबई महापालिका २४ शाळांमध्ये संगीत अकादमी सुरू करणार आहे. या कामासाठी आवश्यक असणारे संगीत वाद्ये, फर्निचर आणि इतर वस्तू यांची खरेदी पक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी २४ केंद्रशाळांतील संगीत अकादमीमध्ये मानधन देऊन संगीत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना अभिजात भारतीय संगीताचे विधिवत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दरम्यान लोअर परेल येथील एन.एम.जोशी मार्ग महापालिकेच्या शाळेमध्ये साऊंडप्रुफ हॉल तयार केला जाईल. येथे मॉडेल संगी केंद्राची उभारणी करण्यात येईल. संगीत तज्ज्ञ मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली हे करण्यात येणार आहे. यामध्ये अॅकॉस्टीक फलोरींग, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, क्रोम कास्ट, वायफाय इत्यादी सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.


हेही वाचा – BMC Budget 2021 : महापालिका CBSC बोर्डाच्या १० नवीन शाळा सुरू करणार