coastal road : 2023 च्या अखेरपर्यंत ‘कोस्टल रोड’ होणार पूर्ण, अर्थसंकल्पात ३२०० कोटींची तरतूद

पॅकेज I, II व IV च्या सर्व कामांची सुरुवात झाली आहे असून याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे

bmc budget 2022 coastal road BMC to divert Rs 3200 crore for coastal road project

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आज गुरुवारी मुंबई महापालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पात यंदा महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडसाठीही ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.  मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात कोस्टल रोड प्रकल्प हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सर्वात प्रतिष्ठित प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे. यामुळे आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरीस या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण करण्याचा पालिकेचा निर्धार आहे. यासाठी सन २०२१-२२ च्या सुधारित अंदाजात ३५०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण यंदा म्हणजे  २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजात ३२०० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे बहुसंख्य नागरिकांच्या वेळेसह इंधनाचीही बचत होण्यास मदत होणार आहे. मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड बांधकामाचा मूळ खर्च ८४२९.४४ कोटी इतका आहे. मात्र कर, पर्यवेक्षण आकार, सल्लागारांचे शुल्क आणि इतर आकारासह एकूण खर्च १२९५० कोटी इतका आहे.

पॅकेज I, II व IV च्या सर्व कामांची सुरुवात झाली आहे असून याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पॅकेज IV मध्ये, प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटीपर्यंतच्या २०७२ मीटरच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे.  भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. एकल स्तंभी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यावर, कंत्राटदाराने पॅकेज I साठी ५.१० कोटी व पॅकेज II साठी ६.८४ कोटी इतकी प्रकल्प खर्चात बचत केली आहे. तसेच प्रकल्प कालावधी आणखी तीन महिन्यांनी कमी होईल.