घरमुंबईनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण समिती अनभिज्ञ

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण समिती अनभिज्ञ

Subscribe

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मुंबई महानगरपालिकेकडून कोणती पूर्वतयारी करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे शिक्षण समिती सदस्य पंकज यादव यांनी या शैक्षणिक धोरणाबाबत महानगरपालिकेतील सदस्यांना तसेच अधिकाऱ्यांना सादरीकरण करत प्रशिक्षित करावे, अशी मागणी सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत केली.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ‘व्हिजन’ मध्येच ‘ग्लोबल’ शब्द वापरण्यात आला आहे. त्यातच शैक्षणिक धोरणाची सर्वसमावेशकता स्पष्ट होते. शिक्षण हे विद्यार्थ्यासोबत आंतरक्रियेतून घडते. त्यादृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणाची रचना करण्यात आली आहे. या धोरणामध्ये केलेल्या विचारांची यशस्वीपणे अंमलबजावणी शक्य आहे. त्यासाठी तातडीने उपायोजना करावी लागेल, असे भाजपचे पंकज यादव यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

शैक्षणिक धोरण कौशल्य आधारित असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणांची यशस्वीपणे अंमलबजावणी करताना अधिकारी वर्गाला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याची सर्वकष माहिती सभागृहातील सदस्यांना असावी. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिका सदस्यांना याबाबत प्रशिक्षित करावे, अशीही मागणी यादव यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -