घरताज्या घडामोडी'टाटा'च्या धर्मशाळेला महापालिकेचे ४० कोटींचे दान

‘टाटा’च्या धर्मशाळेला महापालिकेचे ४० कोटींचे दान

Subscribe

मुंबईत परळ येथे असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या धर्मशाळेला महापालिकेने कोटींचे दान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे धर्णशाळेचे बांधकाम पूर्ण होईल, असं सुत्रांनी सांगितलं आहे.

परळच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांकरिता उभारण्यात येणार्‍या धर्मशाळेला मुंबई महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. रुग्णालयाच्यावतीने धर्मशाळेचे बांधकाम सुरु असून त्यासाठी मुंबई महापालिकेने ४० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्धार करत धर्मशाळेसाठी कोटींचे दान देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल सेंटर तथा टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे मुंबईतील एकमेव कर्करोग रग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात मुंबईसह राज्यातून तसेच देशातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. कर्करोगावरील उपचार हे प्रदीर्घ असल्याने तसेच बहुतांश गरीब रुग्ण आणि त्यांचे कुटुंबिय हे पदपथ, रेल्वे स्थानक किंवा पुलाखाली राहतात. तर कित्येक रुग्णांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने मुंबईत राहून पूर्ण उपचार घेणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे काही रुग्ण हे कुपोषण, गंभीर रोग प्रार्दुभावाचे बळी ठरतात आणि त्यांच्यामध्ये सुधारणा होताना दिसत आहेत.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ‘टाटा’च्या कमी दरात उपचार दिले जाणार

त्यामुळे गरीब आणि गरजू कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियाकरिता टाटा मेमोरियल सेंटरच्यावतीने शिवडी येथील हाफकिनच्या जागेवर ‘ए’ आणि ‘बी’ विंगच्या १५ मजल्याची इमारत बांधण्यात येत आहे. यापैंकी ‘ए‘ विंगच्या जागेवर डॉक्टर्स क्वार्टर्स आणि नर्सेस हॉस्टेल आहेत. यापैकी एका इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे तर दुसर्‍या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे बांधकाम सुरू होणार्‍या दुसर्‍या इमारतींचा वापर गरीब आणि गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता धर्मशाळा म्हणून केला जाणार आहे. टाटा मेमोरियल सेंटरला ४० कोटी रुपयांचे अनुदान दिल्यास धर्मशाळेचे बांधकाम पूर्ण होईल. त्याबदल्यात महापालिकेचे कर्मचारी तथा कामगारांवर ‘टाटा’च्या कमी दरात उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच महापालिकेने शिफारस केलेल्या रुग्णांना या धर्मशाळेत प्रवेश दिला जाईल, अशा प्रकारच्या अटींवर या ४० कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लेखा विभागाच्या सुत्रांनी सांगितली आहे. ही सर्व रक्कम एकरकमी टाटा सेंटरला दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लवकरच याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आयुक्तांच्या कार्यालयात सॅनिटायझर हाताला लावूनच प्रवेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -