घरताज्या घडामोडीBMC : प्रदूषण रोखण्यासाठी इमारतींना लागू केलेल्या नियमाच्या चिंधड्या

BMC : प्रदूषण रोखण्यासाठी इमारतींना लागू केलेल्या नियमाच्या चिंधड्या

Subscribe

मुंबईमधील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने इमारतींना चारही बाजूने 'ग्रीन नेट ' लावणे बंधनकारक केले होते. मात्र सध्या अनेक ठिकाणी निर्माणाधिन इमारतींना 'ग्रीन नेट ' चारही बाजूने लावलेले दिसून येत नाही. तसेच, ज्या इमारतींना नेट लावले आहे, त्यापैकी अनेक इमारतींच्या 'ग्रीन नेट' च्या 'चिंधड्या चिंधड्या' झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : मुंबईमधील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने इमारतींना चारही बाजूने ‘ग्रीन नेट ‘ लावणे बंधनकारक केले होते. मात्र सध्या अनेक ठिकाणी निर्माणाधिन इमारतींना ‘ग्रीन नेट ‘ चारही बाजूने लावलेले दिसून येत नाही. तसेच, ज्या इमारतींना नेट लावले आहे, त्यापैकी अनेक इमारतींच्या ‘ग्रीन नेट’ च्या ‘चिंधड्या चिंधड्या’ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेला प्रदूषण पूर्णपणे रोखण्यात अपयश येत असून नियमांच्या चिंधड्या होण्यास कारणीभूत इमारतींवर पालिकेकडून होणारी कारवाई ठप्प झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (BMC Mumbai Pollution Control Green Net)

मुंबईत काही दिवसांपूर्वी हवेतील प्रदूषण वाढले होते. त्याला हवेतील धूळ अधिक कारणीभूत होती. तसेच, वाहनातील इंधनामुळे होणारे प्रदूषणही हातभार लागत होता. त्यावरून केंद्रीय, राज्य प्रदूषण नियंत्रण विभाग, न्यायालय यांनी पालिकेचे कान उपटले होते. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका प्रशासन, ते चालविणारे पालिका आयुक्त यांचे चांगलेच फटकारले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत रस्ते सफाई, रस्त्यांची धुलाई, नवनिर्माण होणाऱ्या इमारतींच्या सभोवती ‘ग्रीन नेट’ लावणे,पाण्याचा वापर करून रस्ते धुणे, कचरा उचलून स्वच्छता राखणे आदी विविध उपाययोजना विशेष नियमाद्वारे अंमलात आणणे सुरू केले. दर शनिवारी मुंबईत सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येते.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News : वीज बिल अपडेटच्या नावाने गंडा घालणार्‍या आरोपीस अटक; मध्यप्रदेशात वांद्रे पोलिसांची कारवाई

मात्र आजही अनेक इमारतींना लावण्यात आलेले ‘ग्रीन नेट ‘ हे फाटक्या अवस्थेत, अगदी त्या नेटच्या ‘ चिंधड्या चिंधड्या ‘ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याबाबत काही सुधारणा करण्यात यावी, नवीन नेट लावण्यास बिल्डरांना भाग पाडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या बिल्डरांनी नियमाच्या चिंधड्या केल्या आहेत व त्यामुळे आजही प्रदूषणाला हातभार लागत असेल तर त्या बिल्डरांवर पालिका दंडात्मक कारवाई का करीत नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

- Advertisement -

मुंबईत घाटकोपर, जोगेश्वरी, दादर, परळ, भायखळा, मालाड आदी विविध भागात अनेक इमारतींना लावण्यात आलेले ‘ ग्रीन नेट ‘ अत्यंत फाटक्या अवस्थेत दिसून येत आहेत. तरी त्याची दखल महापालिका प्रशासन स्वतःहून का घेत नाही? त्यावर कठोर कारवाई का करीत नाही, असे प्रश्न निर्माण होत आहेत.


हेही वाचा – BMC : पावसाळ्यात मुंबईची तुंबई न होण्यासाठी पालिकेची तयारी सुरू; आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -