Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील खासगी सोसायट्यांमध्ये सुरु होणार आता लसीकरण केंद्र

मुंबईतील खासगी सोसायट्यांमध्ये सुरु होणार आता लसीकरण केंद्र

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढीबरोबरचं लसीकरण मोहिमही वेगाने राबवली जात आहे. मुंबईतील खासगी रुग्णालय, सरकारी रुग्णालय, आणि पालिकेने सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांमध्येच नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु आता मुंबईतील खासगी सोसायट्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांचा आवारात लसीकरण मोहिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र या रुग्णालयांना पालिकेने लसीकरणासाठी ठरवून दिलेले प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयांसाठी सरकारने ठरविलेल्या किंमतीवर या लसी सोसायटीतील सदस्यांना मिळणार आहेत. दरम्यान यासंदर्भात काही गृहनिर्माण संस्थांनी यापूर्वीच पालिकेशी चर्चा केली आहे, तर काही सोसायट्या लसीकरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

यावर बोलताना, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), सुरेश काकानी यांनी सांगितले की, हाऊसिंग सोसायट्या, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, बँका आणि कॉर्पोरेट्स क्षेत्रातील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी खासगी रुग्णांसह टायअप करत खाजगी लसीकरण केंद्र सुरु करु शकतात. पालिकेने आत्तापर्यंत ७५ पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांना सोसाट्यांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी दिली असून यात अजून रुग्णालयांची भर पडणार आहे. परंतु खासगी रुग्णालयांना लसीकरणादरम्यान संबंधित सोसायट्यांमधील नागरिकांची लसीकरणानंतर डॉक्टरांचा निरीक्षणाखाली ठेवत योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच पालिकेने लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे योग्य पालन करावे लागणार आहे.
दरम्यान ज्या नागरिकांना मोफत लस हवी आहे अशांसाठी पालिकेने २२७ नवीन केंद्रे सुरु केली आहेत. परंतु या केंद्रावर पुरेसा लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना विनामूल्य लस मिळणार आहे.

- Advertisement -

दरम्यान मुंबईतील लोढा ग्रुपने आपल्या प्रकल्पांतील अनेक सोसायट्यांमध्ये खासगी रुग्णालयांच्या माध्यामातून लसीकरण मोहिम सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. यावर बोलताना लोढा ग्रुपच्या प्रवक्त्याने सांगितले की, महानगरपालिकेने आम्हाला सोसायट्यांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आम्ही स्थानिक खासगी रूग्णालयांशी लसी घेण्यासंदर्भात करार केला आहे.


 

- Advertisement -

 

- Advertisement -