घरताज्या घडामोडीBMC : मालमत्ता कर 25 मे पूर्वी न भरल्यास कठोर दंडात्मक कारवाईचे...

BMC : मालमत्ता कर 25 मे पूर्वी न भरल्यास कठोर दंडात्मक कारवाईचे ब्रह्मास्त्र

Subscribe

महापालिकेने आर्थिक वर्ष संपल्यानंतरही कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना २५ मे पर्यंत सर्व थकबाकी भरण्याबाबत फर्मावले आहे. आतापर्यंत पालिकेकडून अनेकदा विनंत्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई : महापालिकेने आर्थिक वर्ष संपल्यानंतरही कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना २५ मे पर्यंत सर्व थकबाकी भरण्याबाबत फर्मावले आहे. आतापर्यंत पालिकेकडून अनेकदा विनंत्या करण्यात आल्या आहेत. मात्र २५ मे पर्यंत जर मालमत्ता धारकांनी त्यांचा थकीत मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे ‘ब्रह्मास्त्र’ उगारण्याचा इशारा महापालिका कर निर्धारण व संकलन खात्याने दिला आहे. (BMC strict penal action if property tax is not paid before May 25)

मुंबई महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी एक ‘मालमत्ता कर’ आहे. मात्र महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात म्हणजे काहीसे उशिराने बिल जारी केले. परिणामी कर थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यासाठी वारंवार विनंती, आवाहन करणे सुरू आहे. पालिकेकडून विशेष जनजागृती करण्यावर पालिकेकडून भर दिला जात आहे.

- Advertisement -

मात्र तरीही पालिकेकडे आर्थिक वर्ष संपताना म्हणजे ३१ मार्चपर्यंत तिजोरीत ४,५०० कोटी रुपयांपैकी ३,१९५ कोटी ९१ लाख ११ हजार रुपये जमा झाले. उर्वरित १,३०५ कोटी रुपये कर वसुली करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी पालिकेने कर थकबाकीदारांना २५ मे पर्यंत मुदत वाठवून दिली आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा भरण्यासाठी २५ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या विहित मुदतीपूर्वी मालमत्ता करभरणा करून पालिकेला सहकार्य करावे.अन्यथा करभरणा न करनाऱ्या मालमत्ताधारकांवर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.

- Advertisement -

१२ एप्रिल रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

१) फ्लोरीट इन्व्हेसमेंट प्रा. लि (डी विभाग)- २ कोटी ६४ लाख ९० हजार ३९९ रुपये

२) दर्शन प्रॉपर्टीज (एम पश्चिम विभाग)- २ कोटी ५८ लाख ९७ हजार ९८८ रुपये

३) मोहम्मद कन्स्ट्रक्शन (के पश्चिम विभाग)- २ कोटी ५६ लाख ७ हजार ९१६ रुपये

४) समीर भाऊनाथ जोशी (के पश्चिम विभाग)- २ कोटी ५५ लाख १९ हजार ७८० रुपये

५) हरदेवी पी. राजपाल (एच पश्चिम विभाग)- २ कोटी ५४ लाख ९४ हजार २३९ रुपये

६) मेसर्स लिओ रिअॅल्टर्स (पी दक्षिण विभाग)-२ कोटी ४८ लाख ६९ हजार २१७ रुपये

७) मानवेंद्र गृहनिर्माण संस्था मर्यादीत (एच पश्चिम विभाग)- २ कोटी ४२ लाख ५३ हजार ६८६ रुपये

८) सी. आर. टूर्स अँड ट्रॅव्हल्स (जी दक्षिण विभाग)- २ कोटी ४१ लाख १५ हजार ४९१ रुपये

९) समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स (पी उत्तर विभाग)- २ कोटी ३१ लाख ८६ हजार २४७ रुपये

१०) लोखंडवाला कटारिया कन्स्ट्रक्शन (जी दक्षिण विभाग)- २ कोटी २९ लाख ११ हजार १५५ रुपये


हेही वाचा – Mumbai News : मिठी नदीच्या कामाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना; पालिकेसह एमएमआरडीए रडारवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -