घरमुंबईखोट्या सिमकार्डद्वारे फसवणूक करणाऱया दोघांना अटक

खोट्या सिमकार्डद्वारे फसवणूक करणाऱया दोघांना अटक

Subscribe

बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने दरवेळेस नवीन वेगवेगळ्या नंबरचे सिमकार्डमार्फत जस्ट डायल या साईटवरुन रिटेलर/डिस्ट्रीब्युटरचा नंबर प्राप्त करणे. त्यानंतर डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधून इलेक्ट्रीक सामानाची ऑर्डर देऊन ठराविक दुकानदाराकडे पाठविण्यास सांगणे. डिस्ट्रीब्यूटरला त्या दुकानात माल ठेवल्यानंतर तेथेच रक्कम अदा करण्यात येईल म्हणून सांगण्यात येत असे.

मात्र त्याची रक्कम अदा करण्यात येत नसे. अशा पद्धतीने माल मिळवून डिस्ट्रीब्यूटरला पर्यायाने रिटेलरला फसवण्याचा गोरखधंदा मागील चार ते पाच वर्षापासून करीत असलेल्या दोन जणांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली असून एकजण फरार आहे. पुरनचंद भवरलाल जैन, भुमाराम नैनाजी क्म्हार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

बल्ब, वायर,कॉपरवायर,पंखे, स्वीच यासारखे इलेक्ट्रीक सामान एखाद्या अनोळखी दुकानात डिलेव्हरी करण्यास सांगत व तेथेच रक्कम अदा करु असे फोनवरच सांगण्यात येत असे. तर दुसरीकडे एखाद्या अनोळखी दुकानदाराचा नंबर मिळवुन मारवाडी किंवा गुजराती भाषेत आमचा माल येत आहे तो थोडा वेळ दुकानाजवळ ठेवा असे सांगत. डिस्ट्रीब्युटरने माल आणला की त्याला पैसे घेण्याकरीता दुसरीकडे बोलावित असत. त्याचवेळी काही ठराविक अंतरावर उभा असलेला आरोपी एखाद्या टेम्पोला फोन करुन दुकानातील माल घेवुन दुसर्‍या ठिकाणी सोडण्यास सांगत असे. दुसर्‍या ठिकाणी माल पोहोचताच तेथून माल पुन्हा रिक्षाने तिसरीकडे घेऊन जात.त्यामुळे डिस्ट्रीब्यूटरला त्याची रक्कमही आणि मालही मिळत नसे. अशा प्रकारे फसवाफसवीचा हा धंदा हे आरोपी करीत असत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -