घरमुंबईलग्न मोडण्यासाठी प्रियकराने तिचे अश्लील फोटो पाठवले

लग्न मोडण्यासाठी प्रियकराने तिचे अश्लील फोटो पाठवले

Subscribe

प्रेयसीचे लग्न मोडण्यासाठी प्रियकराने दोघांचे अश्लील फोटो तिच्या होणाऱ्या सासऱ्याला आणि तिच्या बहिनीला पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रियकराला वर्सोवा पोलिसांनी अटक केली असून लोकल कोर्टाने त्याला १७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रेयसीचे ठरलेले लग्न मोडावे म्हणून प्रियकराने त्यांच्यातील अश्लील फोटो आणि व्हिडिओ सासर्‍यासह बहिणीला पाठवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भादवी आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच माजी प्रियकराला गुजरात येथून वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. मनिष सोन सोनाराम सोलंखी असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव आहे. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याला बुधवारी अंधेरीतील लोकल कोर्टाने १७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

२३ वर्षांची तक्रारदार तरुणी ही अंधेरीतील चारबंगला, म्हाडा वसाहतीत राहते. तिचे मनिषसोबत प्रेमसंबंध होते. मात्र नंतर त्यांच्यातील प्रेमसंबंध तिने तोडून टाकले होते. याच दरम्यान तिच्या पालकांनी तिचे एका तरुणासोबत लग्न ठरविले होते. १४ मे रोजी एका अज्ञात मोबाईलवरुन तिच्या सासर्‍यासह बहिणीला एका अज्ञात व्यक्तीने मनिष आणि तक्रारदार तरुणीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठविले होते. जेणेकरुन तिचे ठरलेले लग्न मोडेल आणि ती पुन्हा त्याच्याकडे येईल, असा आरोपीचे प्रयत्न होते. हा प्रकार तिच्या बहिणीसह सासर्‍याकडून समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्या फोटो आणि व्हिडिओबाबत तिच्यासह मनिषला माहित होते. मनिषने ते फोटो आणि व्हिडीओ पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच मनिषला सोमवारी गुजरातच्या वलसाड शहरातून वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ते फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिची बदनामी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. एक दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला मंगळवारी अंधेरीतील लोकल कोर्टाने १७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – भिवंडीत एका वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -