घरताज्या घडामोडीमुसळधार पावसात इमारती आणि गाळ्यांचे भाग कोसळले; ३ जण जखमी

मुसळधार पावसात इमारती आणि गाळ्यांचे भाग कोसळले; ३ जण जखमी

Subscribe

पावसात कुर्ला येथील दोन मजली इमारतीचा भाग कोसळला. परंतु, ही इमारत अति धोकादायक होती. त्यामुळे जो भाग कोसळला तिथे कुणी राहत नव्हते. तर जोगेश्वरी येथेही दोन गाळ्यांच्या भिंती कोसळून तीन जण जखमी झाले आहेत.

मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु असतानाच दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाची रिमझिम सुरुच होती. मात्र, या पावसात कुर्ला येथील दोन मजली इमारतीचा भाग कोसळला. परंतु, ही इमारत अति धोकादायक होती. त्यामुळे जो भाग कोसळला तिथे कुणी राहत नव्हते. तर जोगेश्वरी येथेही दोन गाळ्यांच्या भिंती कोसळून तीन जण जखमी झाले आहेत.

मुंबईत दिवसभरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहरात ३७.४३ मि.मी, पश्चिम उपनगरात ३४.०४ मि.मी आणि पूर्व उपनगरांत ५२.६ मि.मी एवढा पाऊस कोसळला. मात्र, पुढील २४ तासांमध्ये आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मात्र, दिवसभरात कुठेही पाणी तुंबण्याचे प्रकार घडले नाहीत. तर संपूर्ण मुंबईत १८ झाडे पडण्याचे तर पाच ठिकाणी शॉर्टसर्कीटचे प्रकार घडले आहेत.

- Advertisement -

जोगेश्वरीत भिंत कोसळून ३ जण जखमी

पश्चिम उपनगरात दुपारी बारा वाजता जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी येथील शिवसेना शाखेसमोर रिकाम्या असलेल्या तळ अधिक दोन मजल्यांच्या चाळींच्या भिंतीचा भाग बाहेरच्या बाजुस पडून तीन जण किरकोळ जखमी झाले. साकीरा शेख (२२), तौशिक शेख (२८) फातिमा कुरेशी (६०) अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले.

कुर्ल्यात अति धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

कुर्ला स्टेशन रोड भागात मुंबई महापालिकेच्या एल विभागाच्या कार्यालयला लागूनच नेताब ही तीन मजली जुन्या इमारतीचा भाग कोसळला. ही इमारत पालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केली होती. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुपारी उपनगरांत मुसळधार पावसाची बरसात झाली तेव्हाच दुपारी १२च्या सुमारास ही दुघर्टना घडली होती.महापालिकेने ही इमारत अतिधोकादायक केली असली तरी त्यामध्ये काही कुटुंबे वास्तव्य करून होती. मात्र, दुघर्टना झाल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. त्यानंतर ही इमारत रिकामी करण्यात आली. येथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. इमारतीचा जो भाग कोसळला त्या ठिकाणी कुणीही वास्तव्य करत नव्हते. त्यामुळे सुदैवाने मोठी मनुष्यहानी टळली.

- Advertisement -

विहार तलावात सापडला मृतदेह

विहार तलावात सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तरंगणाऱ्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याला तातडीने पोलिसांच्या स्वाधीन करत मुलुंडच्या रुग्णालयात नेण्यात आले. मृतांची ओळख पटलेली नसून त्यांचे वय अंदाजे ३८ वर्षे एवढे आहे.


हेही वाचा – Coronavirus: गेल्या २४ तासांत मुंबईत १,२९८ कोरोनाचे नवे रुग्ण; ६७ जणांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -