घरCORONA UPDATECoronavirus Crisis: भिवंडीत कॅन्सर रुग्णाचा ट्रिपल सीट जीवघेणा प्रवास

Coronavirus Crisis: भिवंडीत कॅन्सर रुग्णाचा ट्रिपल सीट जीवघेणा प्रवास

Subscribe

कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊन झालेल्या काळात लाखो भुकेल्यांची भूक भागविण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. मात्र एका शस्त्रक्रिया झालेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला मुलुंड ते भिवंडी येथे निवासस्थानी जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याला मुलाने आपल्या बाईकवर सोडले. यावेळी हातात तीन-चार पिशव्या घेऊन आईसह ट्रिपल सीट प्रवास करावा लागला. या प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलं. पण नाकात नळी लावलेला रुग्ण दिसल्यावर जाऊ दिले. पण कोणीही रुग्णवाहिका अथवा वाहनाची व्यवस्था करून दिली नाही, हे पाहिल्यावर म्हणावसं वाटते येथे ओशाळली माणुसकी…

भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात राहणारे विरस्वामी कोंडा याना तोंडाचा कर्करोग झाला होता. त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुंबई टाटा कर्करोग रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी २० हजार रुपये जमा केले. परंतु तीन महीने झाल्यावर तुमच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन महिने थांबावे लागेल, खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे सुचवीत त्यासाठी मुलुंड येथील आशीर्वाद हॉस्पिटलचे नाव सुचविले. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून शस्त्रक्रिया केली. त्यानंतर कर्करोग रुग्ण विरस्वामी कोंड आणि त्यांच्या पत्नीची परवड सुरू झाली.

- Advertisement -

शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी घरी जाण्याचे सुचविले. परंतु त्या दरम्यान कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावामुळे डॉक्टरांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. त्यानंतर रुग्णाच्या नाकातील जेवण देण्याची नळी बदलणे, इतर ट्रीटमेंट करणे यासाठी पुन्हा भिवंडी वरून येणे जमणार नसल्याने लक्ष्मी कोंडा यांनी मुलुंड परिसरातील गुरुद्वारात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या ठिकाणी सुध्दा आठ दिवस झाल्यापासून तेथील व्यवस्थापकांनी घरी जाण्याबाबत तगादा लावला. नंतर शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी भिवंडी येथील आपल्या घरी दुचाकी वरून रुग्णासह मुला बरोबर जीवघेणा प्रवास केला.

विरस्वामी कोंडा यांचा मुलगा राजू कोंडा याने वडिलांना घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची विचारणा केली. तर अव्वाच्या सव्वा दर आकारत कोणी ४ तर कोणी ५ हजार रुपयांची मागणी करू लागल्याने राजू कोंडा याने आपल्या वडिलांसह आईस ट्रिपल सीट भिवंडी येथे घेऊन येण्याचा निर्णय घेतला. सोबत रुग्णालयात घेऊन गेलेले साहित्य यांच्या तीन भल्या मोठ्या पिशव्या घेऊन हा प्रवास भिवंडीपर्यंत केला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असताना हे कुटुंबीय ट्रिपल सीट आलेच कसे? हा प्रश्न प्रत्येकाला सतावत होता. पण पोलीस बाईकवर पेशंट असल्याचे बघून पुढे जाऊ देत होते. परंतु यापैकी कोणीही या रुग्णासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान ठाण्यात रस्त्यात बाईक मधील पेट्रोल संपले अशा अवस्थेत एक नागरिक देवदूत बनून आला ज्याने आपल्या बाईक मधील पेट्रोल काढून यांच्या बाईकमध्ये दिल्याने ते कसेबसे रात्री १०.३० वाजता भिवंडी शहरात दाखल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -