घरमुंबईनायर हॉस्पिटलमध्ये होणार कॅशलेस उपचार!

नायर हॉस्पिटलमध्ये होणार कॅशलेस उपचार!

Subscribe

पालिका हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाने नायर हॉस्पिटलमध्ये कॅशलेस कार्डची सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये लवकरच कॅशलेस कार्डची सुविधा सुरू केली जाणार आहे. यामुळे, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी लागणारे पैसे भरण्यासाठी रांग लावण्याची गरज पडणार नाही आणि ते एका कार्डमधून पैसे भरु शकतील. नायरमध्ये या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला तर पालिकेच्या इतर हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरू करण्याचा विचार आहे. पालिका हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाने नायर हॉस्पिटलमध्ये कॅशलेस कार्डची सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.

नवीन वर्षांपासून सुरू होणार सुविधा

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅशलेस कार्ड सेवा सुरू झाल्यावर रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना कॅश ठेवण्याची गरज भासणार नाही. तसंच, उपचारादरम्यान वेगवेगळे पैसे भरण्यासाठी इथे-तिथे फिरण्याची गरज पडणार नाही. ही सुविधा सुरू करण्यासाठी बँकासोबतही चर्चा केली जात आहे. येत्या नवीन वर्षात याची सुरूवात केली जाऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – पाऊस गेल्यानंतरही मुंबईकर लेप्टोच्या विळख्यात

कार्ड काम कसं करणार?

कॅशलेस सुविधेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना कार्ड दिले जाणार. यात रुग्ण आपली गरज आणि सुविधेनुसार रिचार्ज करु शकतो. या कार्डमुळे हॉस्पिटलमधील कोणत्याही विभागातील पैसे भरले जाऊ शकतात. यासाठी हॉस्पिटलमध्ये अनेक जागेवर वेंडिंग मशीन लावली जाणार आहे.

परळमध्ये असलेल्या टाटा हॉस्पिटलध्ये ही कॅशलेस कार्डची सुविधा सुरू आहे. तिथे रुग्ण रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफीसह इतर उपचारांची पैसे कार्डने भरु शकतात. टाटामध्ये राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पानुसार ही सुविधा राबवली जाणार आहे आणि इतर हॉस्पिटलमध्ये ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे.
डॉ. रमेश भारमल, पालिका हॉस्पिटलचे संचालक आणि नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -