घरमुंबईCCTV : उल्हासनगरच्या रस्त्यांवर मध्यरात्री 'मौत का खेल'!

CCTV : उल्हासनगरच्या रस्त्यांवर मध्यरात्री ‘मौत का खेल’!

Subscribe

उल्हासनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची पाठलाग करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने आरोपींचा शोध सुरू केला आहे.

उल्हासनगरमधल्या धुरू ऑर्केस्ट्रा बारमध्ये झालेल्या भांडणात एका तरुणावर तब्बल ३० वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. जोपर्यंत आरोपींना गजाआड केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृताच्या नातलगांनी घेतला आहे. दीपक भोईर असं या घटनेत हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चौकशी करत असून त्याद्वारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याची दृश्य कैद

माणेरा गावात राहणारा दीपक भोईर आणि मराठा सेक्शनमध्ये राहणारा नरेश चव्हाण उर्फ बबल्या हे दोघे त्यांच्या मित्रांसोबत कॅम्प नंबर २ मधल्या वादग्रस्त धुरू बारमध्ये आले होते. तिथे दीपक आणि त्याच्या मित्रांचा बबल्या आणि त्याच्या गटाशी वाद झाला. त्यांच्याच बाचाबाची देखील झाली. वाद झाल्यावर दीपक खाली उतरला. मात्र, यानंतर त्याच्याच मागोमाग बबल्या आणि त्याचे मित्र उतरले आणि त्यांनी दीपक आणि त्याच्या मित्रांचा पाठलाग सुरू केला. दीपकचे मित्र पुढे धावत सुटल्यावर मागे असलेला दीपक खाली पडला. तो खाली पडताच पाठलाग करणाऱ्या टोळक्याने दीपकवर धारदार शस्रांनी तब्बल ३० वार केले. यामध्ये दीपकचा जागीच मृत्यू झाला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दीपकला दोन बहिणी असून तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

- Advertisement -

पाठलाग करून तरुणाचा काढला काटा

पाठलाग करून तरुणाचा काढला काटा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜನವರಿ 21, 2020

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

याबाबत उल्हासनगर ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांच्याकडे विचारणा केली असता, यातील मुख्य आरोपी नरेश चव्हाण उर्फ बबल्या असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. या आरोपींचा शोध सध्या सुरू असून लवकरच ते गजाआड होतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -