घरCORONA UPDATELockDown: #MainBhiMumbaiPolice अभियानाला सेलिब्रिटींचा पाठिंबा

LockDown: #MainBhiMumbaiPolice अभियानाला सेलिब्रिटींचा पाठिंबा

Subscribe

कोरोनाविरोधातील आपला हा लढा अधिक बळकट करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून #MainBhiMumbaiPolice ही संकल्पना राबवण्यात येत आहे.

कोरोनाविरोधातील लढाईत सामाजिक अंतर आणि घरी राहणे ही काळाची गरज आहे. कधीही झोपत नसलेल्या शहरासाठी, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मुंबई पोलीस अहोरात्र काम करत आहेत. कोरोनाविरोधातील आपला हा लढा अधिक बळकट करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून #MainBhiMumbaiPolice ही संकल्पना राबवण्यात येत आहे. या संकल्पनेला मुबईतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना आता बॉलिवूडमधील सेलिब्रिटींकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी घरातून बाहेर पडणे नव्हे तर घरात राहणे महत्त्वाचे आहे. असे असतानाही अनेक नागरिक बिनदास्तपणे घरातून बाहेर पडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी #MainBhiMumbaiPolice ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांनी सेल्फ पोलिसिंगची जबाबदारी स्विकारून स्वत:ला आपल्या घरचे पोलीस बनवून घरातील प्रत्येक सदस्य घरातच राहतील आणि कोरोनाच्या संसर्गाच्या स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवतील, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीला मुंबई पोलीस होण्याचे आवाहन करत घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला रोखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या #MainBhiMumbaiPolice या संकल्पनेला सर्वसामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता त्याला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूडचे सेलिब्रिटीही उतरले आहेत. अनुष्का शर्मा, करीना कपूर खान, सोनम कपूर, रिया कपूर, सोनाक्षी सिन्हा, नीना गुप्ता, राहुल बोस या कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून या मोहिमेचे कौतुक करत त्याचा प्रसार करत आहेत. #MainBhiMumbaiPolice ही संकल्पना मुंबई पोलिसांनी लोवे लिंटास, गोलिन ऑपिनियन आणि मोगा मीडिया यांच्या सहकार्यातून हाती घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Lockdown: २५ दिवस, २८०० किमीचा प्रवास; गुजरातमधून चालत गाठलं आसाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -