Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'मरे'ची अशीही कमाई! चित्रीकरणातून कमावले कोट्यवधी!

‘मरे’ची अशीही कमाई! चित्रीकरणातून कमावले कोट्यवधी!

Related Story

- Advertisement -

‘मुंबईकरांची लाईफलाईन’ अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलची बॉलिवुडमध्ये देखील आगळी-वेगळी ओळख आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आजवर आपण अनेकदा हिंदी सिनेमांमध्ये रेल्वेचे सीन पाहिले असतील. मात्र, मध्य रेल्वेने चित्रपट, जाहिरात आणि मालिकांच्या चित्रीकरणातून कोट्यवधींची कमाई केली आहे. या चालू वर्षात म्हणजेच २०१८-१९ मध्ये छायाचित्रीकरणातून मध्य रेल्वेने तब्बल १ कोटी ८७ हजार ९६० रुपयांची कमाई केली आहे. तर, २०१७ सालच्या कमाईपेक्षा ही कमाई तब्बल २६ लाखांनी वाढली आहे. २०१७-१८ मध्ये केवळ ७४ लाख रुपये चित्रीकरणातून मध्य रेल्वेला मिळाले होते.

सर्वाधिक पसंती वाडीबंदर यार्डला!

चित्रपटाचे अनेकदा शुटींग रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळते. यामध्ये मध्य रेल्वेवरील चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंती वाडीबंदर यार्डला मिळाली आहे. गेल्यावर्षी या यार्डमध्ये रेल्वे स्थानक चित्रपट आणि जाहिरातींसाठी तब्बल १५ वेळा चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यातून २०१७-१८ मध्ये १ कोटी ८७ हजार ९६० रुपयांची कमाई झाली. तर, २०१६-१७ मध्ये १५ चित्रीकरणातून ७४ लाखांची कमाई झाली होती.

- Advertisement -