दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ‘मरे’ची विशेष योजना

मुंबई लोकलवरील दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे सोबत रेल्वे सुरक्षा बलाने देखील विशेष योजना

मध्य रेल्वे.

गेल्या चार महिन्यांपासून मध्य रेल्वेवरील लोकलवर दगफेकीच्या घटना वाढत आहेत. मुंबई लोकलवर अनेक दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटना सर्वात जास्त कांजुरमार्ग ते कुर्ला स्थानकादरम्यान घडल्या आहेत. त्यामुळे या घटनेवर आळा घालण्याकरिता मध्य रेल्वेने रेल्वे आपली पावले उचलली आहे.

मुंबई लोकलवरील दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे सोबत रेल्वे सुरक्षा बलाने देखील विशेष योजना हाती घेतली आहे.

हेही वाचा – लोकलवरील दगडफेक रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे पथक तैनात

अशी असेल ‘मरे’ची योजना

  • मध्य रेल्वेच्या स्थानकांवर गस्त घालणे
  • झोपडपट्टीमधील राहणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करणे
  • या योजनेतील मध्य रेल्वेच्या स्थानकांदरम्यान साध्या वेशात असणारे पोलीस नियुक्त करून तेथे देखरेख करणे

मध्य रेल्वेच्या स्थानकावरील कांजुरमार्ग ते कुर्ला स्थानकादरम्यान सातत्याने दगडफेकीच्या घटना होत असल्याने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. तसेच, कांजुरमार्ग-विक्रोळी-घाटकोपर आणि घाटकोपर-विद्याविहार मार्गावर १६ आणि दादर-कुर्ला-विद्याविहार मार्गावर २० रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना नियुक्त करून त्यांच्यावर गस्त घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.