घरमुंबईप्रत्येक नागरिकाचे नाव राम ठेवा म्हणजे देशाचा विकास होईल

प्रत्येक नागरिकाचे नाव राम ठेवा म्हणजे देशाचा विकास होईल

Subscribe

देशात सध्या शहरांची नावे बदलली जात आहेत. यावर निशाणा साधताना हार्दिक पटेल यांने भलतेच वक्तव्य केले आहे.

या देशात जर फक्त शहरांची नावे बदलून सोन्याची चिमणी उडणार असेल तर भारतातील १२५ कोटी नागरिकांचे नाव बदलून राम ठेवायला पाहिजे, असे वक्तव्य पटेल आरक्षणासाठी आंदोलन उभारणाऱ्या हार्दिक पटेल याने केले आहे. सध्या देशभरात शहर, जिल्हे आणि राज्याचे नाव बदलण्यावरून वाद चालू आहे. पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलण्यावरुन ममता बॅनर्जी यांनी केंद्रवर निशाणा साधला आहे. मात्र नामांतराच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जी आणि हार्दिक पटेल यांच्या भूमिकेत बदल आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव प्रयागराज तर फैजाबादचे नामकरण अयोध्या केले होते. राम मंदिर बांधण्यावरुन पुन्हा एकदा भाजप-संघ तयारी करत आहे. त्यातच फैजाबादचे अयोध्या असे नामकरण केल्यानंतर रामाचा पुतळा उभारणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. या विषयावरुनच हार्दिक पटेलने सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. या देशात बेरोजगारी, शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित असताना हे लोक नाव आणि पुतळे बनवण्यात गुंग असल्याची टीका हार्दिक पटेल याने केली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -