घरताज्या घडामोडीलोणावळ्यात सुरू असलेल्या कामांमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

लोणावळ्यात सुरू असलेल्या कामांमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Subscribe

मध्य रेल्वे, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) सुरू करण्यासाठी लोणावळा येथे स्टेशन आणि यार्ड लाइन्ससह विशेष ट्रॅफिक ब्लॉक परिचालीत करणार आहे. ब्लॉक २७ ऑक्टोबर २०२१ ते ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत परिचालीत केले जातील. तथापि, प्रमुख ट्रॅफिक ब्लॉक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी ०५.२० ते १८.२० वाजेपर्यंत तीन टप्प्यांत चालविला जाईल, ज्यामुळे ट्रेन चालविण्याचा पॅटर्न खालीलप्रमाणे असेल:

विशेष गाड्या रद्द

• ०१००७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे विशेष आणि ०१००८  पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (विशेष डेक्कन एक्सप्रेस) ३० ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणारी.

- Advertisement -

विशेष गाड्यांचे वेळापत्रक

• ०१०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस- कोईम्बतूर ३० ऑक्टोबर २०२१ सुटणारी विशेष  ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी ०४.४० वाजता पुनःनिर्धारित करण्यात आली आहे.

डाऊन विशेष ट्रेनचे नियमन

•  ०४१९० ग्वाल्हेर – दौंड विशेष दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी ग्वाल्हेर येथून सुटणारी विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२१ रोजी चौक येथे एका तासासाठी नियमित केली जाईल.

- Advertisement -

•  ०१०१७  लोकमान्य टिळक टर्मिनस – कराक्कैल विशेष, ०१०१९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – भुवनेश्वर विशेष आणि  ०७०३१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद विशेष, ब्लॉकचे क्लीयरन्स मिळेपर्यंत मार्गात नियमित केले जातील.

अप विशेष गाड्यांचे नियमन  

•  ०१०१४  कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष आणि ०२१६४ चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणारी विशेष मार्गात मध्येच नियमित केली जाईल आणि गंतव्यस्थानी अनुक्रमे ५ तास २० मिनिटे आणि ३ तास ​​४० मिनिटे उशिराने पोहोचेल.

• ०९०५३ चेन्नई- अहमदाबाद विशेष  ३० ऑक्टोबर २०२१ रोजी पुणे येथे पोहोचणारी ट्रेन, वसई रोड येथे ४ तास ४५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

३० ऑक्टोबर २०२१ रोजी लोणावळा येथे पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन विशेष गाड्या गंतव्यस्थान/इंटरचेंज पॉईंटवर १५ ते ३० मिनिटे उशिराने पोहोचतील.

पुणे- लोणावळा उपनगरीय गाड्या

सध्या कार्यरत असलेल्या सर्व पुणे- लोणावळा उपनगरीय लोकल  ३० ऑक्टोबर  २०२१ रोजी रद्द राहतील. लोणावळा येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू होईपर्यंत उपनगरीय लोकल गाड्या लोणावळ्याच्या आधीपर्यंत चालविण्यात येऊ शकतात.


हे ही वाचा – Drug Case :आर्यनच्या जामीन अर्जावर आता गुरूवारी सुनावणी, तुरूंगातील मुक्काम वाढला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -