Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन 

शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन 

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेबांचा आज आठवा स्मृतीदिन आहे

Related Story

- Advertisement -
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी लावली. यावेळी शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांचीही उपस्थिती होती. सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत. कोरोनाव्हायसरचा संसर्ग सुरु असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क वापरणं आणि सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आले आहे.

 

बाळासाहेब ठाकरे शरीराने आता आमच्यासोबत नसले तरीही त्यांचे विचार आमच्यासोबत कायम राहतील असे उद्गार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी काढले. बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि आताचे हिंदुत्व यावरही टिप्पणी त्यांनी केली. शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच स्मृतीस्थळाच्या ठिकाणी हजेरी लावली असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आदींचीही उपस्थिती होती. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महापौर किशोरी पेडणेकर आदींनीही हजेरी लावली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गर्दी करु नका, आपल्या घरातूनच त्यांना अभिवादन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना केलं आहे. तसेच स्मृतीस्थळाच्या ठिकाणी फार कोणाला प्रवेश देऊ नका, अशी सूचनाही मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानुसार इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- Advertisement -

 
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही ट्विटरवरून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. ते खऱ्या अर्थाने जननायक होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
- Advertisement -

 

अजित दादांनी ट्विट केले आहे की, ”नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य करणारे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! ”
- Advertisement -