घरताज्या घडामोडीJNU प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...

JNU प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

Subscribe

जेएनयू हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

रविवारी रात्री दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये झालेल्या राड्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘जेएनयूमध्ये झालेला हल्ला मला मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यासारखा वाटला. पण मी राज्यातल्या तरुणांना आश्वस्त करू इच्छितो, की महाराष्ट्रात मी अशी कोणतीही बाब सहन करणार नाही, महाराष्ट्रात असं काहीही होणार नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हात असल्याच्या आरोपाविषयी मात्र त्यांनी बोलण्यास नकार देत, ‘आधी सत्य बाहेर येऊ द्या’, असं उत्तर दिलं.

‘मी हे सहन करणार नाही’

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी हल्लेखोरांना भित्रे म्हटलं. ‘देशात जी अस्वस्थता आहे, तिच्यावर एकत्र येऊन विचार करायला हवा. या युवकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे. ज्यांनी हल्ला केला ते बुरखाधारी भित्रे आहेत. जर त्यांच्यात हिंमत असती, तर त्यांनी तोंडावर बुरखा नसता घातला. जे कुणी असतील, त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे’, असं ते म्हणाले. तसेच, ‘मला हा हल्ला २६/११ सारखा वाटला. असे हल्ले मी महाराष्ट्रात सहन करणार नाही. या गोष्टीसाठी जे कुणी जबाबदार आहेत, त्यांना शोधून शिक्षा देणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात चिंता करण्याचं कारण नाही. मी तरुणांना आश्वासन देतो, की अशी कोणतीही बाब मी महाराष्ट्रात सहन करणार नाही’, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

‘राजकारणात पडायचं नाही’

यावेळी अभाविपच्या कनेक्शनबद्दल बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. ‘मला राजकारणात पडायचं नाही. बुरख्याच्या पाठी जो कुठला चेहरा आहे, तो देशासमोर यायला हवा. पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर संशय येणारच. जेव्हा हल्लेखोरांचे चेहेरे समोर येतील, तेव्हाच त्यामागचे जबाबदार लोकं समोर येतील’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


Video – रविवारी रात्री अशा घडल्या घडामोडी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -