घरमुंबईराज्यात पारा घसरला; हुडहुडी वाढली

राज्यात पारा घसरला; हुडहुडी वाढली

Subscribe

डिसेंबर महिना उजाडला तरी थंडी दडी मारुन बसल्याचे चित्र राज्यात होते. अगदी १५ डिसेंबरपर्यंत वातावरणात साधा गारवा जाणवत नव्हता. नेमका हिवाळा आहे की उन्हाळा, असा प्रश्न निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळेतही तापमान २५ अंशाच्या आसपास राहत होते. मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पारा चांगलाच घसरत चालला आहे. थंडी हळूहळू जाणवू लागली. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या. सकाळच्या वेळेत धुक्यांची चादर सर्वदूर पसरताना दिसत आहे.

 

मुंबईः महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा चांगलाच घसरला आहे. बहुतांश भागात तापमान १० ते ११ अंश सेलसिअसच्या आसपास खाली उतरले आहे. येत्या काही दिवसांत पारा अजून खाली जाण्याची शक्यता आहे. नववर्षाचे स्वागत हुडहुडीनेच होईल, असे वातावरण सध्या आहे. हरियाणातील नारनौल येथे २.४ तर हिसार येथे २.५ अंश सेलसिअसची नोंद झाली आहे. पुढील ४८ तासांत उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

डिसेंबर महिना उजाडला तरी थंडी दडी मारुन बसल्याचे चित्र राज्यात होते. अगदी १५ डिसेंबरपर्यंत वातावरणात साधा गारवा जाणवत नव्हता. नेमका हिवाळा आहे की उन्हाळा, असा प्रश्न निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळेतही तापमान २५ अंशाच्या आसपास राहत होते. मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पारा चांगलाच घसरत चालला आहे. थंडी हळूहळू जाणवू लागली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या. सकाळच्या वेळेत धुक्यांची चादर सर्वदूर पसरताना दिसत आहे.

मराठवाड्यासह विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात पारा उतरत चालला आहे. सुर्याची किरणे धुक्यातून वाट काढताना दिसत आहेत. धुक्यामुळे रस्ते काहीसे ओले होत आहेत. मुंबईतही गेल्या चार पाच दिवसांपासून तापमानात घट होत आहे. थंडीचा जोर हळूहळू वाढत आहे.

- Advertisement -

देशभरातही थंडी वाढत चालली असल्याचे चित्र आहे. उत्तर भारत गारठला आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड व राजधानी दिल्लीत थंडीचा तडाखा वाढला आहे. या ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या येथे थंडीचा जोर वाढला आहे. येथील शहरी व ग्रामिण भागात शेकोट्या पेटल्या आहेत.

हिवाळ्यात होणाऱ्या पिकांसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे. मात्र श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे. मधूमेह व उच्चदाब असलेल्या रुग्णांनीही आरोग्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. रुग्णांनी पोषक आहार घ्यावा व नियमित व्यायाम करावा, असे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -