घरमुंबईपरमबीर सिंह यांची एसीबीकडून गोपनीय चौकशी

परमबीर सिंह यांची एसीबीकडून गोपनीय चौकशी

Subscribe

एसीबीकडे पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे आणि एपीआय अनुप डांगे यांनी सिंह यांनी भ्रष्टाचाराची तक्रार परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी काही संपुष्टात येताना दिसत नाहीत. त्यातच अडचणींमध्ये भर घालणारी आणखी एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे परमबीर सिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) तीन प्रकरणातील चौकशी सुरू झाली आहे. तीन तक्रारदारांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीमुळेच ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. एसीबीमार्फत ही प्राथमिक स्वरूपाची अशी गोपनीय स्वरूपाची चौकशी आहे. या गोपनीय चौकशीत म्हणजे डिस्क्रीट एनक्वायरीमध्ये पुढे गुन्हा दाखलही होण्याची शक्यता आहे.

एसीबीकडे पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे आणि एपीआय अनुप डांगे यांनी सिंह यांनी भ्रष्टाचाराची तक्रार परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल केली आहे. तर क्रिकेट बुकी सोनू जालान यानेही बेकायदेशीररित्या पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच परबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता. आता या प्रकरणात एसीबीकडून म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तीन प्रकरणाची गोपनीय चौकशी (डिस्क्रीट एनक्वायरी) सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

- Advertisement -

ही प्राथमिक स्वरूपाची चौकशी असते जी तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडते. त्यानंतर जे पुरावे प्राथमिक चौकशीत मिळतात त्यानुसार खुली चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ठरते. सध्या तरी या तीनही प्रकरणामध्ये गोपनीय चौकशीला सुरुवात झाली असून लवकरच संबंधित तक्रारदारांना जबाबासाठी समन्स पाठवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी परमबीर यांच्यावर करोडो रुपयांचे भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत. शिवाय अनुप डांगे यांनीही सिंग यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेत. सोनू जालान याने परमबीर यांनी त्याच्याकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच या तिघांच्याही तक्रारी पोलीस महासंचालक कार्यालयाला मिळाल्या होत्या. पोलीस महासंचालक कार्यालयाने या मिळालेल्या तक्रारी एसीबीला पाठवल्या. त्यानंतर या प्रकरणात प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -