घरमुंबईप्रियांकांच्या आगमनाने देशातील राजकारण बदलेल - संजय राऊत

प्रियांकांच्या आगमनाने देशातील राजकारण बदलेल – संजय राऊत

Subscribe

प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील आगमनाने देशातील राजकारण बदलेल, असे मत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशावर बोलत होते. यावेळी त्यांनी या देशावर कायम गांधी घराण्याचा प्रभाव राहिल्याचेही नमूद केले.

प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या राजकारणातील आगमनाने देशातील राजकारण बदलेल, असे मत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ते प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशावर बोलत होते. यावेळी त्यांनी या देशावर कायम गांधी घराण्याचा प्रभाव राहिल्याचेही नमूद केले.

काय म्हणाले राऊत

राऊत म्हणाले की, “नवीन चेहऱ्यामुळे राजकारणात फरक पडतो. मग ते महात्मा गांधी असोत किंवा इंदिरा गांधी किंवा इतर कुणी गांधी परिवारातील व्यक्ती. प्रियांकाच्या राजकारणातील प्रवेशाने देशातील राजकारण बदलेल. येत्या काळात ते दिसेलही. राहुल गांधी यांचा हा अत्यंत चांगला निर्णय आहे. या देशातील जनतेने गांधी परिवारासोबत एक जिव्हाळ्याचे नाते ठेवले आहे. सत्ता असो अथवा नसो पण ते कायम राहिले आहे. निवडणूक जिंकले अथवा हारले तरी त्यांचे नाते कायम आहे. त्यामुळे या देशात इंदिरा गांधी यांची अनेक काळ सत्ता राहिली आहे. यामुळे प्रियांका गांधी यांच्या या आगमनाचा येत्या काळात काँग्रेसला मोठा फायदा होईल.

- Advertisement -

पानसे मला विचारून निघाले

‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, की सिनेमा अजून सुरू आहे, आम्ही पाहतोय. सिनेमा फार उत्कृष्ट झाला आहे. सर्वांना आवडतो आहे. या सिनेमामुळे बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व काय होते ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. याच चित्रपटाच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावणारे अभिजित पानसे हे निघून गेल्याने त्यावर राऊत यांनी खुलासा केला. अभिजित पानसे नाराज नाहीत. हे स्क्रिनिंग ज्यांनी नाही पाहिले, त्यांच्यासाठी होते. पानसे यांनी सिनेमा पाहिला आहे. ते त्यांच्या कामासाठी मला विचारून निघून गेल्याचेही राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -