Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई नाना पटोलेंची जीभ घसरली, मोदींना म्हणाले 'फेकू'

नाना पटोलेंची जीभ घसरली, मोदींना म्हणाले ‘फेकू’

जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी राज्यपालांचा मुद्दा

Related Story

- Advertisement -

नवनिर्वाचित महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जॉइन सोशल मीडिया कॅम्पेनचे महाराष्ट्रात अनावरण केले. यावेळी नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली आहे. पत्रकार परिषद सुरु असताना नाना पटोलेंना स्वामिनाथन आयोगावरुन प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत असताना नाना पटोले म्हणाले की, स्वामिनाथन आयोगाची शिफारस जेव्हा केंद्र सरकार समोर आली. तेव्हा सरकारने ६० : ४० शिफारशीला स्विकृत केला बाकी शिफारशीवर विचार करण्यात येत होता. परंतु निवडणूक आली, निवडणूक आल्यानंतर स्वामिनाथन समितीची शिफारस लागू करण्यात येईल असे ‘फेकू’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नाना पटोलेंच्या बोलण्यात चुकून फेकू हा शब्द उच्चारला गेला होता. त्यांनी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणाले.

जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी राज्यपालांचा मुद्दा

भाजप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थ ठरत आहे. तर जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी भाजप वारंवार राज्यपालांचा मुद्दा पुढे आणत आहे. भाजप विखारी राजकारण करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. लोकांची लक्षे प्रश्नांवरुन विचलित करण्यासाठी राज्यपालांचा मुद्दा पुढे आणण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी भावूकपणा दाखवा

- Advertisement -

भाजप देशातील प्रश्नांवर का नाही बोलत, देशातील नागरिक पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने हैराण आहेत. त्याच्यावर का नाही बोलत भाजप असाही प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणासाठी अश्रू काढतात संसदेत. शेतकऱ्यांसाठी का नाही अश्रू काढत, महागाई वाढली यावर का नाही बोलत मोदी सरकार असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -