घरमुंबईशीव रुग्णालयाच्या पुनर्विकासात ३ नवीन इमारतींचे बांधकाम!

शीव रुग्णालयाच्या पुनर्विकासात ३ नवीन इमारतींचे बांधकाम!

Subscribe

शीव रुग्णालय हे १९०० खाटांचे प्रस्तावित आहे. रुग्णालय आवारातील बराकमधील जुन्या कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती पाडून त्याठिकाणी या सेवा निवासस्थान व पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत व तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे.

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या पुनर्विकासात तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. परिचारिका महाविद्यालय, अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान इमारत तसेच निवासी डॉक्टरांसाठीच्या इमारतींचा यामध्ये समावेश आहे. यासाठी कार्पोरेट क्षेत्रातील अग्रगण्य बांधकाम व्यावसायिक असलेल्या अहलुवालिया कॉन्ट्क्ट (इंडिया) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह एकूण ६७२.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. परंतु याबाबत कंत्राटदाराशी वाटाघाटी करून कंत्राट किंमत कमी करण्याचा प्रयत्न सुरु असून आधी स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे. प्रस्ताव मंजुरीनंतरच वाटाघाटी करत कंत्राट किंमत कमी केली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमबाह्यच प्रस्ताव मंजूर करण्याचा घाट घातल्यामुळे या रुग्णालयाच्या आवारातील इमारत बांधकामाला खिळ बसण्याची शक्यता आहे.
शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासात तीन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या मागील बाजुस तळ अधिक २० मजल्याची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकार्‍यांसाठी निवासस्थान इमारत बांधणे, रुग्णालयाच्या अखत्यारित बराक प्लॉटवर तळ अधिक १९ मजल्याची महापालिकेच्या उपयोगाकरता व कर्मचारी निवास्थानाची इमारत बांधणे तसेच याच ठिकाणी तळ अधिक २५ मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, याशिवाय तळ अधिक ३ मजल्याची तात्पुरता निवारा इमारत आदींच्या बांधकामांसाठी नवी दिल्लीतील अर्कोप व शशांक मेहेंदळे अ‍ॅण्ड असोशिएटस आदींनी बनवलेल्या आराखड्यानुसार निविदा मागवल्या. त्यामध्ये दोन निविदाकारांनी भाग घेतला. यामध्ये अंदाजित खर्चापेक्षा १४ टक्के अधिक बोली लावणार्‍या अहलुवालिया कॉन्ट्क्ट इंडिया लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली.
शीव रुग्णालय हे १९०० खाटांचे प्रस्तावित आहे. रुग्णालय आवारातील बराकमधील जुन्या कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती पाडून त्याठिकाणी या सेवा निवासस्थान व पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत व तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे. यासाठी इमारत बांधकाम व पुढील देखभाल यासाठी ६७२.५५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे. या कंपनीने लावलेली बोलीची रक्कम वाटाघाटी करून कमी केली जाणार आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल,आरोग्य संचालक व नगर अभियंता यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करून त्यांच्या माध्ययमातून कंत्राटदाराशी वाटाघाटी करत दर कमी केला जाईल,असे सांगण्यात आले. त्यामुळे वाटाघाटी न करताच प्रशासनाने आचारसंहितेच्या भीतीमुळे वाटाघाटी करण्यापूर्वीच थेट हा प्रस्तावच स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आणला आहे.
या रुग्णालयाच्या कंत्राट कामांचा दर जर अधिक असेल तर वाटाघाटी करून त्यानंतरच हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आणायला हवा. परंतु स्थायी समितीने आधी प्रस्ताव मंजूर करायचा आणि त्यानंतरच वाटाघाटी करून ही रक्कम कमी केली जाणार असा जो दावा प्रशासन करत आहे, हा चुकीचा आहे. अशाप्रकारे प्रस्ताव मंजूर करणे नियमबाह्य आहे. विशेष म्हणजे त्रिसदस्यीस समितीमध्ये आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांचा समावेशनाही. त्यामुळे .प्रशासनाची भूमिका संदिग्ध वाटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -