घरमुंबई४२ लाखांचा ऐवज लुटणारे ९ चोर अवघ्या ४८ तासांत तुरुंगात

४२ लाखांचा ऐवज लुटणारे ९ चोर अवघ्या ४८ तासांत तुरुंगात

Subscribe

भररस्त्यात घडलेल्या या गुन्ह्याच्या तपासासाठी परिमंडळ ११ चे उपायुक्त विक्रम देशमाने यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. तपासादरम्यान या पथकाने तांत्रिक बाबी तपासून या लुटमार करणाऱ्या ९ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी ९९ टक्के चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज जप्त केला.

मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ११ च्या हद्दितील विशेष पोलीस पथकाने धडाकेबाज कारवाई करून अवघ्या ४८ तासांत ९ चोरांच्या मुसक्या आवळत ४२ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने २४ जुलै २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्या दृष्टीकोनातून एमएचबी कॉलनी पोलीस तपास करत आहेत.

लालू बाबू शेख (२०) याचा मुंबईतील झवेरी बाजार व दहिसर परिसरात सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचा कारखाना आहे. १८ जुलै रोजी लालू शेख हा सहकाऱ्यांसोबत ४८ लाख रुपयांचे १४०५ ग्रॅम वजनाच्या ७० बांगड्या पॉलिश करण्यासाठी दहिसर येथील कारखान्यात घेऊन जात होते. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दहिसर रेल्वे स्थानकाजवळील जयवंत सावंत मार्गावर ४ इसमांनी लालू शेख व त्याच्या सहकाऱ्याला भर रस्त्यात अडवले आणि मारहाण करून शेख याच्या गळ्यातील सोन्याची चेन व ७० बांगड्या असलेली बॅग घेऊन चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी भादंवि कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

भररस्त्यात घडलेल्या या गुन्ह्याच्या तपासासाठी परिमंडळ ११ चे उपायुक्त विक्रम देशमाने यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. तपासादरम्यान या पथकाने तांत्रिक बाबी तपासून लुटमार करणाऱ्या ९ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी ९९ टक्के चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज जप्त केला.

तपासात या पोलिसांचा समावेश

या पोलीस पथकाने परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर मोरे, एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पोलीस पथकात एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे पो.नि. धनंजय लिगाडे, पो.नि. विजय कांदळगावकर, स.पो.नि अजित पाटील, पो.उ.नि जीवन निरगुडे, पो.उ.नि विजय धोत्रे, गोराई पोलीस ठाण्याचे स.पो.नि विवेक तांबे, बोरिवली पोलीस ठाण्याचे स.पो.नि. लोखंडे, मालाड पोलीस ठाण्याचे पो.उ.नि चव्हाण, पो.उ.नि मुलाणी, कांदिवली पोलीस ठाण्याचे पो.उ.नि पाचांगणे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोउनि मुजावर, एमएचबी पोलीस ठाण्याचे पोना खान, तावडे, शिपाई नाईक, सुरवसे, बोबडे, कांदिवली पोलीस ठाण्याचे पोशि क्षीरसागर, राऊत, गोराई पोलीस ठाण्याचे पोना कारजावकर, पोशि सावंत, नाडगौडा आदींचा समावेश होता. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दितल्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विषेश पथकाची नेमणूक करण्यात येते. त्याच पद्धतीने हे सूद्धा पथक नेमण्यात आले होते अखेर या गुन्ह्याचा उलगडा झाला असून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -