घरमुंबईCorona Vaccination : मुंबईत लसीकरण केंद्रे ठप्प होण्याचा धोका!

Corona Vaccination : मुंबईत लसीकरण केंद्रे ठप्प होण्याचा धोका!

Subscribe

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे.

मुंबईत कोरोनावरील लसीचा साठा हा संपुष्टात येत आहे. आज दिवसभरात लसीचा साठा कमी पडल्यामुळे ३५ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली. उर्वरित लसीचा साठा हा उद्या संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच शिल्लक असून लसीचा नव्याने साठा उपलब्ध न झाल्यास मुंबईतील सर्वच केंद्रे लसीअभावी बंद करावी लागण्याचा धोका आहे. मुंबईसाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लसीचा साठा पुणे येथून येणार आहे. लसीचा साठा कमी झाल्याने ३५ लसीकरण केंद्रे बंद करावी लागल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मात्र, जर लसीचा साठा उपलब्ध न झाल्यास सर्वच लसीकरण केंद्रे बंद करावी लागतील, असेही त्या म्हणाल्या.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीचा डोस देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आहे त्या नागरिकांनाच आवश्यक लसीचा पुरवठा होत नसल्याने पालिकेला पूर्ण क्षमतेने लसीकरण करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

मुंबईत लसीकरण पूर्ण क्षमतेने करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आवश्यक लसीचा पुरवठा वेळेत होत नसल्याने आज लसीकरण प्रक्रिया अडचणीत आली आहे. त्यामुळे मुंबईला लवकर मुबलक लसीचा साठा उपलब्ध झाला, तरच १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य करता येणार आहे. अन्यथा मुंबईत कोरोना आणि लसीकरणाची भीषण परिस्थिती निर्माण होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -