घरमुंबईभारतात १४ ठिकाणी लस शोधण्याचे काम सुरू, ४ लसींचे क्लिनिकल ट्रायल घेतलं...

भारतात १४ ठिकाणी लस शोधण्याचे काम सुरू, ४ लसींचे क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार

Subscribe

भारतात १४ ठिकाणी लस शोधण्याचे काम सुरू असून ते सध्या निरनिराळ्या टप्प्यात

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ झाल्याने जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोना विरूद्ध लढण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी देशातील वैज्ञानिकही सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असताना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतात १४ ठिकाणी लस शोधण्याचे काम सुरू असून ते सध्या निरनिराळ्या टप्प्यात आहे. त्यापैकी ४ लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी सोशल मीडियावरून संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारी रोखण्यासाठी लस विकसित करत आहे. लस तयार करण्यासाठी १०० हून अधिक जण काम करत असून विविध टप्प्यांवर काम सुरू असून जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांसाठी मदत करत आहे.’

- Advertisement -

भारतात १४ ठिकाणी लस शोधण्याचे काम सुरू

‘भारतातही कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु असून अनेक वैज्ञानिक सक्रियरित्या काम करत आहेत. आपल्या देशात १४ ठिकाणी काम सुरु असून विविध टप्प्यांमध्ये हे संशोधन केलं जात आहे.’, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

येत्या चार ते पाच महिन्यात क्लिनिकल ट्रायल सुरू

तर ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशातील १४ पैकी ठिकाणी सुरू असलेल्या लसींची येत्या चार ते पाच महिन्यात क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. सध्या त्या सर्व प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर आहेत,’ असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.


कोरोना रुग्णांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -