घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १३७२ नवे रुग्ण, आज ४१ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १३७२ नवे रुग्ण, आज ४१ मृत्यू

Subscribe

राज्यात आज दिवसभरात तब्बल २२५० रुग्णांची वाढ झाली आहे. त्याच पद्धतीने आज मुंबईत देखील दिवसभरात मोठ्या संख्येने रुग्ण वाढले असून गेल्या २४ तासांत मुंबईथ तब्बल १३७२ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २३ हजार ९३५वर गेला आहे. आज दिवसभरात मुंबईत ४१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधित मृत्यूंचा आकडा देखील ८४१वर गेला आहे. त्यामुळे मुंबईतलं कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गहिरं होत असल्याचं दिसून येत आहे. या सगळ्यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६ हजार ४६६ झाला आहे.

mumbai corona update letter

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -