Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मोदींबरोबर आमचे व्यक्तिगत भांडण नाही- संजय राऊत

मोदींबरोबर आमचे व्यक्तिगत भांडण नाही- संजय राऊत

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने सर्व राज्यांना मदत करणं गरजेच आहे. विशेषत: महाराष्ट्राला. कारण महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे आपल्या विरोधी पक्ष नेत्यांना माहित असायला हवे. पंतप्रधान मोदींबरोबर आमचे व्यक्तिगत भांडण नाही किंवा केंद्र सरकारविरोधात आमचे व्यक्तिगत भांडण असण्याचा प्रश्नच नाही. पण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे राज्य नाही म्हणून सत्ताधाऱ्यांची प्रत्येक बाबतीत कोंडी करायची, हे राष्ट्रीय एकात्मकतेला आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संजय राऊत बोलत होते. यावेळी लॉकडाऊनवर बोलताना राऊत म्हणाले, काँग्रेसने काय विरोध केला मला माहित नाही. काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न असेल कदाचित इतर सगळ्या विषयाप्रमाणे. पण लॉकडाऊन व्हावं किंवा न व्हावं हा एक राष्ट्रीय प्रश्न आहे. यावर निर्णय फक्त मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. मुख्यमंत्री सुध्दा फार मोठ्या आनंदात, खुशीने अशाप्रकारचे निर्णय घेतात असे नाही. परंतु जी आपतकालीन परिस्थिती उद्बवली आहे त्यापरिस्थितीनुसार मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निर्णय घ्यावे लागतात. जर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर त्यांच्यामागे राज्य़ातल्या विरोधीपक्षांसह सगळ्याच राजकीय पक्षांनी उभे राहावे. असे म्हणत त्यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

- Advertisement -

यावेळी बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आत्मनिर्भर असल्यामुळे इतके वर्षे देशाच्या तिजोरीत आर्थिक भर टाकत आहे. मुंबई शहर अडीच लाख कोटीच्यावर भर आर्थिक भर टाकत आहे. त्यामुळे आम्ही आत्मनिर्भरच आहोत. पण हे संकट असे आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्ण सापडत आहेत. मुंबईत १० हजाराच्या आसपास आहेत हे खरं आहे. याचे कारण असे आहे की, आमच्याकडे कोरोना चाचण्या मोठ्याप्रमाणात होत आहेत मात्र इतर राज्यांमध्ये ते होत नाही. त्यामुळे कोण कुठे जातोय? कोण का आजारी आहे? कोण कुठे मृत्यू होतोय, कशामुळे मृत्यू होतोय ? याची नोंदच नाही याची माहिती इतर राज्यं ठेवत नाही. पण महाराष्ट्राचे कौतुक करायला हवे आणि जगात ते होतेय. त्यामुळे यातून महाराष्ट्र लवकरचं बाहेर पडेल. आर्थिक पॅकेडचा विषय बरोबर आहे, पण जेव्हा जगाची तुलना महाराष्ट्राशी करता तेव्हा त्या त्या देशातल्या केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज दिलेले आहे. असेही राऊत म्हणाले.


 

- Advertisement -