घरमुंबईबाजारात बनावट व्हिटामिन ए, एफडीएच्या कारवाईत साठा जप्त!

बाजारात बनावट व्हिटामिन ए, एफडीएच्या कारवाईत साठा जप्त!

Subscribe

बनावट औषधांच्या रांगेत आता बाजारात बनावट व्हिटामिन ए चाही साठा फिरत असून असाच एक साठा नुकताच एफडीएनं कारवाई करून जप्त केला आहे.

बनावट औषधं विक्रीची काही प्रकरणं नुकतीच समोर आलेली असताना आता बनावट व्हिटामिन- ए ची बाजारात विक्री वाढू लागल्याचं उघड झालं आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील भिवंडी परिसरातून बनावट ‘व्हिटामिन ए’चा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे व्हिटामिन एची विक्री मूळ उत्पादकांच्या पॅकिंगमध्ये नसून अन्य नावाने करण्यात येत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्यानुसार, सापळा रचून एफडीएने ही कारवाई करत ९५ हजारांचा माल जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला या घटनेची माहिती मिळाली. ‘बाजारात व्हिटामिन ए पावडरच्या स्वरुपात विकले जात आहे. हे व्हिटामिन विझार्ड फार्मास्यूटिकल्स प्रा. लि. शापूर राजकोट यांच्या मूळ उत्पादकांच्या पॅकिंगमध्ये नसल्याची’ बाब एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली.


हेही वाचा – बाजारात बनावट बँडेजची विक्री

ठाण्यातून खरेदी झालं व्हिटॅमिन ए

या औषधाचा साठा मे. सिद्धी विनायक फार्मा, वनमाला कंपाऊंड या भिंवंडीतील कंपनीतून जप्त करण्यात आला. पण, या औषधाची खरेदी मे. ट्रायडेंट इंटरमेडिएट अॅण्ड केमिकल भाटिया कॉम्पलेक्स ठाणे यांच्याकडून करण्यात आली होती. या औषधांचा नमुना चाचणी आणि विश्लेषणासाठी ठाण्याच्या औषध निरीक्षकांनी जप्त केला आहे. या जप्त साठ्याची किंमत अंदाजे ९५ हजार असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले. पण, आणखी सखोल चौकशी केल्यानंतर मे ट्रायडेंट इंटरमेडियेट अॅण्ड केमिकलच्या जय हसमुखलाल शाह यांनी राजकोटमध्ये या औषधांची विना बिल विक्री केल्याचं उघड झालं. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, अशी ही माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -