घरमुंबईगावठी दारूच्या भट्ट्या धगधत्याच

गावठी दारूच्या भट्ट्या धगधत्याच

Subscribe

पोलीसही हतबल

वारंवार धाड टाकून आणि माल उद्ध्वस्त करूनही मालजीपाड्यातील गावठी दारूच्या भट्ट्या विझता विझत नसल्यामुळे पोलीस हैराण झाले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गावठी दारूच्या भट्ट्या लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मालजीपाड्यात पुन्हा दोनदा धाड टाकून पोलिसांनी साडेपाच लाखांचा माल नष्ट केला आहे. तरीही येथील भट्ट्या न विझता पुन्हा पेटून उठत आहेत.

गावठी दारू तयार करणारे गाव म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून मालजीपाडा ठाणे, मुंबई, पालघर, वसई-विरार परिसरात ओळखले जात आहे. या गावाच्या टोकाला असलेल्या दलदलीत गावठी दारूच्या भट्ट्या लावल्या जातात. या भट्ट्यांमध्ये सेलचा मसाला, खते किंवा तत्सम रसायने वापरून हजारो लिटर विषारी दारू तयार केली जाते. ही गावठी दारू मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील चाळ किंवा झोपडपट्टीत विकली जाते.

- Advertisement -

या दारूची वाहतूक करण्यासाठी दुचाकी, किंवा सायकलचा वापर केला जातो. दारू लपवून नेण्यासाठी काही तरुणही कामाला लावण्यात आले आहेत. मालजीपाड्यातील दलदलीत शिरता येत नसल्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. मात्र,काही वर्षांपूर्वी विषारी दारूने बळी घेतल्यावर येथील भट्ट्या शांत करण्यात आल्या होत्या. प्रकरण शांत झाल्यानंतर भाईंदर खाडीतील तिवरांच्या बेटात या भट्ट्या पेटत्या झाल्या. या जंगलातून दररोज धूर दिसायला लागल्यावर भट्ट्यांचा शोध लागला. मात्र, या बेटापर्यंत पोहोचण्यासाठी बोटींचा वापर करावा लागल्यामुळे कोणीही हाती लागले नव्हते.

आता या भट्ट्या पुन्हा मोठ्या प्रमाणात धगधगू लागल्या आहेत. गेल्या पंधरवड्यात वालीव पोलिसांनी पाच-सहा वेळा धाड टाकून मालजीपाड्यातील भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. लाखो रुपयांचा मालही नष्ट केला होता. तसेच अनेक वाहनेही जप्त केली होती. तरीही पोलिसांना न जुमानता या भट्ट्या लावण्यात येत आहेत. 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला दोनदा धाड टाकून पोलिसांनी साडेनऊ हजारांची दारू, दोन मोटारसायकली, 252 बॅरल कच्चा माल, 200 लिटर दारू आणि इतर साहित्य असा 5 लाख 36 हजार रुपयांचा माल नष्ट केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -