घरमुंबईगुन्हेगारांच्या हायटेक यंत्रणेपुढे सायबर पोलीस हताश

गुन्हेगारांच्या हायटेक यंत्रणेपुढे सायबर पोलीस हताश

Subscribe

राज्यात दरवर्षी १ हजाराने सायबर गुन्ह्यांत वाढ

राज्यात दरवर्षी सायबर गुन्ह्यांत एक हजार गुन्ह्यांनी वाढ होत असून त्यातील गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर पोलीस अपयशी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सायबर सेल विभागाने दिलेल्या पाच वर्षांच्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. २०१४ पासून ऑक्टोबर २०१८ पर्यंत दरवर्षीच्या गुन्ह्यांत कमालीची वाढ झाली आहे. पण गुन्हेगारांच्या हायटेक यंत्रणेपुढे राज्य सायबर सेलची यंत्रणा निष्फळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

चार वर्षांत एकूण १३७२२ सायबर गुन्ह्यांच्या केसेस महाराष्ट्रात नोंदवण्यात आल्या. मात्र, यापैकी ४३८९ प्रकरणांचा उलगडा करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित ९३३३ प्रकरणांतील आरोपींनी पोलिसांना हुलकावणी दिली. या प्रकरणातील आरोपींना पकडणे पोलिसांना शक्य झाले नाही. राज्य सायबर पोलीस यंत्रणेकडे पुरेशी यंत्रणा असल्याचा दावा केला जात असतानाही आरोपींना पकडण्यात पोलिसांना नामुष्की आल्याने गुन्हेगारांच्या हायटेक यंत्रणेपुढे पोलिसांची यंत्रणा कमजोर पडत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. २०१४ साली नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी २०१५ सालापासून १ हजार गुन्हे वाढले असून त्यांचा शोध लावण्यात पुरेसे यश येत नसल्याने राज्याच्या सायबर सेलसमोर सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

- Advertisement -

राज्य सायबर सेल विभागाकडून वरील सर्व माहिती देण्यात आली असून गुन्हा सिद्ध करून त्याची उकल करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे यामधून दिसत आहे. अनेक गुन्ह्यांत आरोपी चांगल्या दर्जाची हायटेक यंत्रणा वापरतात. त्यामुळे त्यांना पकडणे कठीण जात असल्याचे सायबर विभागाकडून सांगण्यात येते. सध्या सायबर गुन्ह्यांच्या असंख्य तक्रारी दाखल होतात. पण त्यांची उकल करण्यात दिरंगाई होत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मुंबईत दिवसाकाठी नोंद होणारे बरेचसे गुन्हे आमच्याकडे येतात. पूर्वी मुंबईत स्वतंत्र सायबर विभाग होता. मात्र, आता प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल झाल्यापासून त्या पद्धतीने काम होते. गुन्हेगार दिवसेंदिवस हायटेक प्रणालीचा वापर करून गुन्हा करत असल्याने त्यांना पकडण्यासाठी वेळ लागतो.
– रवि सरदेसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल बीकेसी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -