घरमुंबईलालबागमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट: १६ जखमींपैकी दोघांचा मृत्यू

लालबागमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट: १६ जखमींपैकी दोघांचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील लालबाग परिसरातील साराभाई इमारतीतील बंद खोलीत सिलेंडरचा स्फोट

मुंबईतील लालबाग परिसरातील साराभाई इमारतीतील बंद खोलीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत १६ जण होरपळून जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर होती. मिळालेल्या माहितीनुसार, यातील १२ जणांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान केईएममध्ये उपचार घेणाऱ्या दोघांपैकी सुशीला बागरे (६५) या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला तर आज पहाटेच्या दरम्यान वयवर्ष ४५ असणारा करीम नावाच्या व्यक्तीचा देखील दुदैवी मृत्यू झाला. करीम हा कॅटरिंगटचा व्यवसाय करत असून तो साराभाई या इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्याकडे काम करण्यास होता, अशी माहिती मिळतेय.

अशी घडली घटना

लालबागच्या गणेश गल्ली जवळ असणाऱ्या साराभाई या इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या मुलीच्या लग्नाची लगीन घाई सुरू होती, रविवारी हळदी समारंभ होणार होता. मात्र सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास लग्न घरातील गॅस सिलेंडरची गळती सुरू होऊन सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत एकूण १६ जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना केईएम आणि भायखळ्यातील मसीना रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे साराभाई इमारीतीतील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेला असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

लग्नकार्य असलेल्या घरात सिलेंडर स्फोट झाल्यामुळे घराची पडझड झाली असून सामानचंही नुकसान झाले आहे. एवढंच नाही तर स्फोटाची तीव्रता एवढी होती की, आजूबाजूच्या घरांचंही नुकसान झाले आहे. स्फोटामुळे लागलेल्या आगीत आजूबाजूच्या घरांतील कपड्यांसह इतर सामानही जळून खाक झाले आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही वेळातच अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेत १६ जण होरपळून जखमी झाले होते. या १६ जणांपैकी १२ जखमींवर केईएममध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर अद्याप १० जणांवर उपचार सुरू आहेत. तर भायखळ्यातील मसीना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

जखमींची नावे 

प्रथमेश मुणगे (२७)
रोशन अंधारी (४०)
मंगेश राणे (६१)
मंगेश मुणगे (५६)
ज्ञानदेव सावंत (८५)
विनायक शिंदे (७५)
ओम शिंदे (२०)
यश राणे (१९)
मिहीर चव्हाण(२०)
ममता मुनगे(४८)

मृत व्यक्तींचे नावे

  • करीम (४५)
  • सुशीला बागरे (६५)

मसीना रुग्णलायत दाखल

वैशाली हिमांशु (४४)
त्रिशा (१३)
बिपीन (५०)
सूर्यकांत (६०)


दिल्लीत बब्बर खालसा संघटनेशी जोडलेल्या ५ दहशतवाद्यांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -