घरमुंबईआज डबेवाल्यांची सेवा बंद; पश्चिम रेल्वे ठप्प झाल्याने सेवेवर परिणाम

आज डबेवाल्यांची सेवा बंद; पश्चिम रेल्वे ठप्प झाल्याने सेवेवर परिणाम

Subscribe

पूर्व - पश्चिमेला जोडणारा अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळला असून या घटनेचा परिणाम डबेवाल्यांच्या सेवेवर झाला आहे. अंधेरी ते विरार या दरम्यान डबेवाले अडकल्याने आज डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई डबेवाला असोशिएशन घेतला आहे.

अंधेरीमध्ये गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याने मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. अंधेरी ते विरार दरम्यान डबेवाले अडकून पडल्याने डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय डबेवाले कार्यकारणीने घेतला आहे. त्यामुळे घरातूनच जेवणाचे डबे घेऊन कामावर जाण्याचा संदेश मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी मुंबईकरांना दिला आहे. मुंबईकरांची भूक भागवण्याचे त्यांच्या ऑफिसला डबे नेऊन पोहोचवण्याचे काम हे मुंबईतील डबेवाले करतात. त्यांच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडत नाही. मात्र, अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेमुळे मुंबईतील डबेवाल्यांनी देखील आजचा दिवस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोखले पूल दुर्घटनेमध्ये ५ जखमी

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर कुपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी ७.३० वाजता पुलाचा काही भाग कोसळला. त्यामुळे लोकलसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. तुर्तास तरी वांद्रे ते चर्चगेट आणि अंधेरी ते विरार लोकलसेवा सुरू आहे. दरम्यान लोकलसेवा कोलमडल्याने प्रवाशांनी बस आणि रिक्षाकडे मोर्चा वळवला. त्यामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईतील पावसाने काही काळ उसंत घेतली असली वातावरण पाहता पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

रेल्वेसेवेवर परिणाम

मुंबईतील जोरदार पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. अंधेरीतील गोखले पुल दुर्घटनेनमुळे पश्चिम रेल्वे केव्हा सुरू होईल याबद्दल कोणतीही माहिती रेल्वेने दिली नाही. शिवाय, मध्य रेल्वेवर सायन ते कुर्ला भागात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे देखील उशिराने धावत आहे. याचा ताण हा रस्ते वाहतुकीवर जाणवत असून वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -