घरCORONA UPDATEदहिसर, बोरीवलीसह कांदिवलीत कोरोनाचा कहर!

दहिसर, बोरीवलीसह कांदिवलीत कोरोनाचा कहर!

Subscribe

दहिसर, बोरीवली आणि कांदिवलीत रुग्ण संख्या वाढत असल्याने उत्तर मुंबईतील नागरिकांची चिंता वाढलेली आहे.

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच शहर आणि पूर्व उपनगरात कोरोनाचा कहर कमी होवू लागला आहे. मात्र, पश्चिम उपनगरांतील उत्तर मुंबईतील कांदिवली ते दहिसर या तीन विभागांमध्ये कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. महापालिकेच्या ‘आर-दक्षिण’, ‘आर-मध्य’ व ‘आर-उत्तर’ या ‘आर’ विभागांमध्येच कोरोनाचा रेड झोन तयार झाला आहे. पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या विभागात सर्वाधिक रुग्ण असले तरी या विभागात रुग्ण वाढीचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे वरळी, धारावी पाठोपाठ सर्वात तळाच्या क्रमांकावर असलेल्या दहिसर, बोरीवली आणि कांदिवलीत रुग्ण संख्या वाढत असल्याने उत्तर मुंबईतील नागरिकांची चिंता वाढलेली आहे.

कोरोना रुग्णांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला ‘जी-दक्षिण’ आणि ‘जी-उत्तर’ यांनी आपले स्थान सोडत खालच्या क्रमांकावर कुच करताना दिसत आहे. त्यामुळे विलेपाले ते जोगेश्वरी पूर्व या ‘के-पूर्व’ विभाग ४३३६ रुग्ण संख्येने पहिल्या क्रमांकावर आहे. तर मागील महिन्यापासून पहिल्या क्रमांकावर असलेला दादर-माहिम व धारावी या ‘जी-उत्तर’ विभाग आता ४०३७ रुग्ण संख्येने दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कुर्ला ‘एल’ विभाग आहे. या विभागात ३५९१ एवढी रुग्ण संख्या आहे. तर त्याखालोखाल विलेपपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम हा ‘के-पश्चिम’ विभाग व भायखळा ‘ई’ विभाग अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. या दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे ३५०५ व  ३३३६ एवढे एकूण कोरोनाचे रुग्ण झाले आहेत.

- Advertisement -

तर मागील अनेक महिने सर्वात कमी कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने शेवटच्या क्रमांकावर असलेल्या दहिसर ‘आर-उत्तर’ विभाग आता शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाने आता हजारची संख्या पार केली आहे. या विभागात एकूण रुग्ण संख्या १०९७ एवढी झाली आहे. तर पहिल्या क्रमांकावर महापालिकेचा ‘बी’ विभाग व दुसऱ्या क्रमांकावर ‘सी’ विभाग आहे. या दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे ७४६ व ७७२ एवढी रुग्ण संख्या पोहोचली आहे. तर चौथ्या क्रमांकावर महापालिकेचा ‘ए’ विभाग व पाचव्या क्रमांकावर ‘टी’ विभाग आहे. या दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे १४०७ व  १५५५ एवढे रुग्ण आढळून आले आहेत.

मात्र, या कोरोना रुग्णांच्या यादीत सध्या १५व्या स्थानावर कांदिवली ‘आर-दक्षिण’ विभाग आहे. या विभागात आतापर्यंत २११३ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर यादीत १८व्या स्थानावर बोरीवली आर-मध्य विभाग आहे. या विभागात रुग्णांची संख्या १७९६ पोहोचली आहे. तर याच यादीत २२व्य स्थानावर दहिसरचा ‘आर-उत्तर’ विभाग आहे. या विभागात एकूण रुग्ण संख्या १०९६ एवढे झाले. परंतु या यादीत पंधराच्या पुढे हे विभाग असले तरी या तिन्हीच भागांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. यातील दहिसरमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण सरासरी २.४६ च्या तुलनेत ५.३ टक्के एवढे झाले आहे. तर बोरीवलीत हे प्रमाण ४.३ टक्के तर कांदिवलीत हे प्रमाण ३.६ टक्के एवढे आहे. संपूर्ण मुंबईत सध्या याच विभागांमध्ये सर्वांधिक रुग्ण आढळून येत आहे. मात्र,सध्या सर्वाधिक कमी रुग्ण वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच-पूर्व व वडाळा,अँटॉपहिल,शीव या एफ-उत्तर विभागात आहे. या ठिकाणी सध्या १.२ टक्के एवढा आहे. तर त्यापाठोपा गोवंडी मानखुर्दच्या एम-पूर्व विभागात रुग्णवाढीचा दर १.३ टक्के एवढा आहे. त्यापाठोपाठ कुर्ला एल विभाग व भायखळा ई विभाग ( १.४ टक्के), दादर-माहिम व धारावी जी-उत्तर विभाग (१.५ टक्के), वरळी जी-दक्षिण विभाग व कुलाबा ए विभाग (१.८ टक्के)आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -