घरताज्या घडामोडीMaharashtra Unlock: मुंबई, ठाण्यातील निर्बंध शिथिलतेचा निर्णय आज महापालिका घेणार?

Maharashtra Unlock: मुंबई, ठाण्यातील निर्बंध शिथिलतेचा निर्णय आज महापालिका घेणार?

Subscribe

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ही दर जास्त आहे. या सर्व अनुषंगाने राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देणारी नवी नियमावली जारी केली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील नियम जैसे थे असणार आहे. मात्र उर्वरित २५ जिल्ह्यांमध्ये नियम शिथिल झाले आहेत. पण या २५ जिल्ह्यांमधील मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यातील नियम शिथिलतेबाबतचा निर्णय तेथील महापालिका घेणार आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेचा आज निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील अनलॉकच्या नवीन नियमावलीनुसार, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तिन्ही जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन म्हणजेच महापालिका देणार आहे. तसेच मुंबईच्या लोकलबाबत आजही निर्णय झाला नाही आहे. रेल्वे पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

- Advertisement -

११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध जैसे थे

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील.


हेही वाचा – मोठा दिलासा! दुकानांचा वेळ रात्री ८ पर्यंत… वाचा काय आहे नियमावली

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -