बंडखोरांवर कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे, कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाचा ठराव

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी या कार्यकारिणीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण 6 प्रस्ताव ठेवण्यात आले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे नेतेपद काढा, या मागणीमुळे शिंदेंची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी पक्ष उभा असेल, असाही प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. बंडखोरांवर कारवाईचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्याचा महत्वाचा प्रस्तावही मांडण्यात आला.

शिवसेनेच्या कार्यकारिणीतील महत्वाचे प्रस्ताव –

शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल

एकनाथ शिंदे यांचे नेतेपद काढा

शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे

मराठी अस्मितेशी कधीच प्रतारणा करणार नाही

कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगले काम केला. यासाठी उद्धव ठाकरेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार

महत्वाचे प्रस्ताव –

1) बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे –

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बेईमानी करण्याऱ्यांवर कारवाईचे सर्व अधिकार असणार आहेत. बेईमानी करणाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुख थेट कारवाई करू शकतात. बंडखोरांवर कारवाईचे थेट आणि सर्व अधिकार ठाकरेंकडे असणार आहेत.

2) शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल –

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट, या युद्धात शिवसेनेच्या कार्यकारिणीत मोठा निर्णय घेण्यात आला. तसाही प्रस्तावही मांडण्यात आला. शिवसेना ही बाळासाहेबांचीच असणार आणि राहणार, असा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला आहे.

आधी नाथ होते आता दास झाले –

कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मत मागा. आधी नाथ होते आता बाप झाले, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.