घरमुंबईअर्ज मागे न घेतल्याने पक्षातून हाकालपट्टी; दिपक निकाळजेंची आठवलेंवर टीका

अर्ज मागे न घेतल्याने पक्षातून हाकालपट्टी; दिपक निकाळजेंची आठवलेंवर टीका

Subscribe

अर्ज मागे न घेतल्याने आम्हाला पक्षातून काढून टाकण्यात आले, असा गौप्यस्फोट दिपक निकाळजे यांनी करत त्यांनी रामदास आठवलेंवर टीका केली आहे.

रामदास आठवले यांच्या कार्यपद्धतीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मागील निवडणुकीत रिपाईच्या १२८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. पण, या सर्वांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. यावेळी सर्वांनी अर्ज मागे घेतले पण मी आणि आणखी एकाने अर्ज मागे न घेतल्याने आम्हाला पक्षातून काढून टाकण्यात आले, असा गौप्यस्फोट दिपक निकाळजे यांनी रविवारी कल्याण येथे एका कार्यक्रमात केला आहे.

‘विधानसभा निवडणुकीत मी चेंबूर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी तयार असताना मला फलटण विधानसभा संघात निवडणूक लढविणास सांगण्यात आले. मागील निवडणुकीत मी चेंबूर विधानसभा मतदारसंघात ३५ हजार मते मिळवली होती. मी तेथूनच निवडणूक लढविण्यास इच्छुक होतो. पण नंतर माझे तिकीट कापल्याची पेपरबाजी करण्यात आली. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात राहणार’, असे देखील ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात रविवारी झालेल्या मेळाव्यात निकाळजे बोलत होते. पण, ‘आता ती फूट उघड झाली आहे. रिपाई आंबेडकर गटाने आता नवीन अध्यक्ष म्हणून दीपक निकाळजे यांची निवड केल्याने ते आता गावोगावी कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. कल्याणमधील मेळाव्याचे आयोजन हे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले आणि निकाळजेंच्या रिपाईत सामील झालेले धर्मा वक्ते यांनी केले होते. रामदास आठवले यांची १९९० साली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर रामदास आठवले यांनी २०१८ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राजीनामा देत स्वता:चा आरपीआय आठवले गट निर्माण केल्यावर राष्ट्रीय सचिव महेश पाटील यांनी देशातील ३६ राज्यातील कार्यकारिणीची एकत्र बैठक घेत माझी रिपाईएच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

आठवलेंच्या रिपाईत मेल्यावरच पदे खाली होतात

रिपाई राष्ट्रीय सचिव सुनील खांबे यांनी बोलताना सांगितले की, रामदास आठवले यांच्या रिपाई नेते मेल्यावरच पदे खाली होतात. पण रिपाईए मध्ये नवीन पिढीला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. रामदास आठवले यांच्या आरपीआयमध्ये कार्यकर्ते उद्धवस्त झाले पण त्यांचा विचारच केला गेला नाही. आता दिपक निकाळजे यांच्या रिपाईत नवीन कार्यकर्ते आणि नेतृत्व तयार होणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष तसेच स्वाभिमान पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी रिपाईत प्रवेश केला.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवारांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -