मुंबईत शाहू महाराजांचा स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी शिष्टमंडळाची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

राजर्षी शाहूंचे सहा मे १९२२ रोजी मुंबई येथील पन्हाळा लॉजमध्ये निधन झाले.

Demand to Aditya Thackeray to erect a memorial of Shahu Maharaj in Mumbai
मुंबईत शाहू महाराजांचा स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी शिष्टमंडळाची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे निधन झालेल्या मुंबईतील गिरगावमधील ‘पन्हाळा लॉज राजवाडा’ येथे स्मृती स्तंभ उभारावा, अशी मागणी गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि मालोजीराजे शाहू छत्रपती यांच्यासह कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने बुधवारी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे निधन झाले तेथे यावर्षी स्मृती स्तंभ उभारण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. यावेळो स्मृती स्तंभाबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

तसेच, वरळी परिसरात कोल्हापूर निवासी बांधव मोठ्या प्रमाणावर राहत असल्यानेही तेथेही एक स्मारक उभारण्याचा मानस असल्याचे ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात आमदार सर्वश्री चंद्रकांत जाधव, जयंत आजगावकर यांच्यासह ऍड.गुलाबराव घोरपडे, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, किरण चव्हाण, अनुप चौगुले, प्रताप नाईक, राजेश पाटील आदींचा समावेश होता.

नेमके कुठे आहे पन्हाळा लॉज?

राजर्षी शाहूंचे सहा मे १९२२ रोजी मुंबई येथील पन्हाळा लॉजमध्ये निधन झाले. त्या घटनेला ९९ वर्षे झाली. पुढच्या वर्षी या घटनेला शंभर वर्षे होणार आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना सामाजिक न्यायाचे जनक मानले जाते.मागासवर्गीयांचे जीवनमान सुधारुन त्यांना राष्ट्र्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहूंनी आपल्या कोल्हापूर संस्थानात ‘आरक्षण कायदा’ लागू केला. मागासवर्गीय जाती-जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणाची कवाड खुली करुन दिली. याच शाहु महाराजांनी अखेरचा श्वास जिथे घेतला. ते ठिकाण म्हणजे ‘पन्हाळा लॉज’. इतकी वर्ष दुर्लक्षित असलेले हे ठिकाण महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पैलवान संग्राम कांबळे यांनी गेली ३ वर्षे अथक संशोधन करुन  गिरगाव, खेतवाडी मधील गल्ली क्रमांक १३ इथे स्वतः जाऊन जिथे पन्हाळा लॉज होता त्या जागेचा शोध घेतला आहे.


हे ही वाचा – Cruise Drug Bust: एनसीबीच्या कारवाईत संबंध नाही, मुष्यबळ कमी म्हणून मदत केली – मनिष भानुशाली