घरमुंबईदेवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

Subscribe

अमित शहा यांचा दावा

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे केला. मात्र त्यांनी शिवसेनेसोबत युतीचे कोणतेही संकेत दिले नसल्यामुळे युती होणार की नाही, याबाबत सस्पेंन्स कायम आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे काश्मीरमधील कलम ३७० बाबत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहा यांनी महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आणि विधानभा निवडणूक झाल्याने पुन्हा एकदा राज्याचे होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला.

- Advertisement -

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमूक झाले तर आम्ही जिंकू, तमूक नाही झाले तर आम्ही जिंकू, असे गणित मांडत आहे. काहीही झाले तरी भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहुमतासह भाजपाचे सरकार स्थापन होईल. आम्हाला बहुमत मिळेल, असे अमित शहा म्हणाले.

देशहिताच्या प्रश्नावर राजकारण करू नका. सर्जिकल स्ट्राइक एअर स्ट्राइक करण्यात आली तेव्हा विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला. पुरावे मागितले. देशविरोधी घोषणा देणार्‍या जेएनयूमधील विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी उभे राहिले. त्यामुळे आता राष्ट्रवादी भाजपा आणि मित्रपक्षांना साथ द्यायची की परिवारवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना साथ द्यायची, याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने करावा, अशी टीका अमित शहा यांनी केली.

- Advertisement -

कलम ३७० हटवण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. त्यामुळे शरद पवार आणि राहुल गांधी यांनी कलम ३७० हटवण्यास त्यांचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला नमवले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी कौतुक केले होते. १९९४ मध्ये काश्मीरबाबत काँग्रेस सरकारने आणलेल्या प्रस्तावाला भाजपाने पाठिंबा दिला होता. तसेच अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षात असतानाही संयुक्त राष्ट्रांत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, त्यामुळे देशहिताच्या प्रश्नावर राजकारण करू नका, असे अमित शहा म्हणाले.

कलम ३७० हा भाजपासाठी राजकीय मुद्दा आहे, असे राहुल गांधी म्हणतात. पण काश्मीर आणि कलम ३७० हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. कलम ३७० हटवण्यासाठी आमच्या तीन पिढ्या खपल्या आहेत. अनेकांनी बलिदान दिले आहे. अखंड भारत हेच आमचे लक्ष्य आहे. १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी आक्रमण केल्यानंतर आपल्या लष्कराने एकापाठोपाठ एक विजय मिळवत मुसंडी मारली. मात्र त्याचवेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये नेला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी युद्धबंदी जाहीर केली. अचानक युद्धबंदी जाहीर झाली नसती तर आपल्या लष्कराने संपूर्ण काश्मीर मुक्त केला असता आणि पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नच उद्भवला नसला, असेही अमित शहा यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -