घरमुंबईआलोकनाथ यांची मागणी दिंडोशी कोर्टाने फेटाळली

आलोकनाथ यांची मागणी दिंडोशी कोर्टाने फेटाळली

Subscribe

लेखिका विन्टा नंदा हिने मीटू मोहिमेंतर्गत आरोप केलेल्या कलाकार आलोकनाथ यांची मागणी दिंडोशी कोर्टाने फेटाळली.

मीटू मोहिमेत सिनेसृष्टीतील बाबूजी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार आलोकनाथ यांच्या पत्नीने केलेली मागणी दिंडोशी कोर्टाने फेटळली आहे. काही दिवसांपूर्वी विन्टा नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर दारू पिऊन बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोनी राजदानसह इतरही काही अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तणुक केल्याचा आरोप केला होता. या प्रकारानंतर आलोकनाथच्या पत्नीने विन्टा नंदाविरोधात कोर्टात मानहानीचा दावा करण्याची मागणी केली होती. ही मागणी आज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळली.

- Advertisement -

वाचा : #MeToo; विंटा नंदा यांनी आलोकनाथ यांच्याविरुद्ध केली पोलिसांत तक्रार

काय आहे नेमके प्रकरणं

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखिका विंटा नंदा यांनी त्यांच्या फेसुबकवर एक पोस्ट अपलोड करुन एका महिलेची व्यथा मांडली होती. त्यात त्यांनी आलोकनाथ यांनी तिच्यावर लैगिंक अत्याचाराचा आरोप केला होता. आरोपानंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या आरोपानंतर अभिनेत्री नवनीत निशान आणि संध्या मुदुल यांनीही लैगिंक गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यात भर म्हणून की काय सिनेअभिनेत्री रेणुका शहाणे हिने आलोकनाथ यांच्याविरुद्ध जाहीर टिका करुन घडलेल्या प्रकारचे आपण साक्षीदार असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे आलोकनाथ यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर आलोकनाथ यांच्या पत्नीने विंटा नंदा यांच्याविरुद्ध अंधेरीतील स्थानिक न्यायालयात मानहानीचा दावा केला आहे. या दाव्यानंतर विंटा नंदा यांनी बुधवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आलोकनाथ यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे.

- Advertisement -

वाचा : आलोक नाथ यांचा विनता नंदाविरोधात मानहानीचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -