घरमहाराष्ट्रनागपूरमध्ये #MeTooचे बुमरँग

नागपूरमध्ये #MeTooचे बुमरँग

Subscribe

नागपूरमध्ये एका तरुणीने #MeToo चा गैरफायदा घेत सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तपासानंतर हे प्रकरण तरुणीच्या अंगलट आल्याचे समोर आले आहे.

सध्या भारतात #MeToo चळवळ मोठी होताना पहायला मिळत आहे. दररोज नव्या लोकांवर आरोप होत आहेत, त्याचबरोबर रोज नवे लोक या चळवळीला त्यांचा पाठिंबा दर्शवत असल्याचे देखील पहायला मिळत आहेत. मात्र या ‘मीटू’ च्या आधारे एका पोलिस निरीक्षकावर अत्याचार केल्याचा आरोप एका तरुणीने केल्याचे नागपूरमध्ये उघड झाले आहे. परंतु हा आरोप खोटा असल्याचे समोर आले असून #MeToo मध्ये अडकवण्यासाठी केलेली खोटी तक्रार तरुणीच्या चांगलीच अंगलट आली आहे.

नेमके काय घडले?

नागपूर येथील इमामवाडा पोलीस ठाण्यामध्ये एपीआय राजेंद्र मगदुम कार्यरत आहेत. यांची २०१४ साली मगदुम यांना घर खरेदी करायचे होते. त्याच दरम्यान एक तरुणी आपले घर विकत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्या मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तिच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्या तरुणीने आपण २० लाखाला घर विकत असल्याचे सांगितले. त्यानंतर एपीआय राजेंद्र मगदुम आणि त्या तरुणीमध्ये घराबाबतचा व्यवहार झाला. मगदुम यांनी तरुणीला ५ लाख रुपये देऊन १५ लाखांचे बँकेतून कर्ज घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर या तरुणीने घर विकण्यास नकार दिला.

- Advertisement -

अशी वापरली शक्कल

आता आपण या प्रकरणात अडकले जाऊ या भितीने तिने एक नवीन शक्कल लढवली. तिने एपीआय राजेंद्र मगदुम यांना #MeToo प्रकरणात अडकवण्याचा कट रचला. या तरुणने मगदुम यांना अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. मात्र राजेंद्र मगदुम यांनी त्या तरुणीविरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हुडकेश्वर पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर कारवाई केली नाही. अखेर त्यांनी अॅड. समीर सोनवणे यांच्या माध्यमातून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शहजाज परवेज यांच्या न्यायालयात धाव घेतली. तसेच त्यांनी त्या तरुणीने दिलेल्या धमकीचे रेकोर्डिंग न्यायालयात सादर केले. त्या तरुणीविरुद्ध सबळ पुरावे असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी अॅड. सोनावणे यांनी न्यायालयात केली आहे. सबळ पुराव्याच्या आधारे मागणी मंजूर करीत न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांनी करुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


वाचा – #MeToo पोहोचलं गुगलपर्यंत

- Advertisement -

वाचा – #MeToo; आयएएस महिलेला छेडणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करू – मुख्यमंत्री

वाचा – #MeToo: साजिद खानवर आता प्रियांकाचा आरोप

वाचा – #metoo- संजना सांघीने घेतला ‘यू टर्न’

वाचा – #MeToo – ए. आर. रेहमानने व्यक्त केलं आश्चर्य!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -