घरमुंबईबुर्खा घालण्यास कॉलेजची मनाई; विद्यार्थीनीची हायकोर्टात धाव

बुर्खा घालण्यास कॉलेजची मनाई; विद्यार्थीनीची हायकोर्टात धाव

Subscribe

कॉलेजने परिक्षेला बसू न दिल्याने मुंबईतील होमियोपॅथीच्या एका विद्यार्थीनीने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. कॉलेजने या विद्यार्थिनीला बुर्खा घालून वर्गात येण्यास मनाई केली होती. त्यामुळे या विद्यार्थिनीची वर्गातील हजेरी कमी झाली. किमान हजेरी पुर्ण न झाल्यामुळे कॉलेजने या विद्यार्थिनीला परिक्षेला बसू दिले नाही. कॉलेजच्या याच मनमानी कारभाराविरोधात या विद्यार्थिनीने थेट मुंबई हायकोर्टात कॉलेजच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. २५ मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मुंबईतल्या वांद्रे येथे राहणारी फाकिहा बादामी या विद्यार्थिनीने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने असा दावा केला आहे की, तिची कॉलेजमधील उपस्थिती कमी आहे कारण तिला वर्गामध्ये बुर्खा घालून बसून दिले जात नव्हते. फाकिहा ही भिवंडीच्या साई होमियोपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिकते.

- Advertisement -

कॉलेजने हिजाब घालण्यास केली मनाई –
फाकिहाने याचिकेत म्हटलं आहे की, साई होमियोपॅथी मेडिकल कॉलेजने कॅम्पसमध्ये सर्व मुस्लिम विद्यार्थीनींना बुर्खा घालण्यास मनाई केली आहे. तिने २०१६ मध्ये या कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ होमियोपॅथी मेडिसिन अॅण्ड सर्जरी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. हे कॉलेज महाराष्ट्र यूनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सर्विसेसशी (एमयूएचएस ) संलग्न आहे.

आरोग्यमंत्रालयाच्या निर्णयाला कॉलेजने डावलले –
फाकिहाने याप्रकरणी एमयूएचएस आणि आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवले असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. विद्यार्थीनींनी बुर्खा घालू नये, असे बंधन कॉलेज घालू शकत नाही, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. तरी देखील कॉलेजने आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. फाकिहाने याप्रकरणी २०१७ मध्ये कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी तिला परिक्षामध्ये भाग घेण्यास अनुमती दिली गेली नव्हती. याचिकेनुसार कॉलेजने हाय कोर्टला सांगितले होते की, तिला २०१८ मध्ये होणाऱ्या परिक्षेला बसून दिलेजाईल, असे असताना देखील तिला यावर्षी मार्चमध्ये सुरु असलेल्या वर्गात बसून दिले गेले. पण पुन्हा वर्गातील उपस्थिती कमी असल्याचे कारण सांगत तिला परिक्षामध्ये बसून दिले नाही.

- Advertisement -

कॉलेजच्या निर्णयाला कंटाळून विद्यार्थिनींनी सोडले कॉलेज –
या याचिकेत फाकिहाने असं ही म्हटलं आहे की, कॉलेजने बुर्खा घालण्यास मनाई केल्याने इतर मुस्लिम विद्यार्थिनींनी बुर्खा घालणे बंद केले होते. तर काहींनी कॉलेजच्या मनमानी कारभाराला कंटाळून कॉलेज सोडून दिले होते. मात्र फाकिहाने बुर्खा घालणे थांबवले नाही. त्यामुळे कॉलेजकडून त्रास दिला जात असल्याचे तिने म्हटलंय. न्यायमूर्ती एस जे कथावाला आणि न्यामूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर २५ मे ला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -