घरमुंबईअल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Subscribe

डीआयजी निशिकांत मोरे, ड्रायव्हर साळवे निलंबित

नवी मुंबईतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्या मुलीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या नावे धमकावणारा चालक दिनकर साळवे यालाही निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश गृह विभागामार्फत देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान, निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन पनवेल कोर्टाने फेटाळण्यात आला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

पुण्याचे पोलीस महानिरीक्षक (डीआयजी)निशिकांत मोरे यांनी पनवेल तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरण आता एका भयानक आणि धक्कादायक वळणावर आले आहे. ७ जानेवारी रोजी सदर प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर पनवेल कोर्टाच्या परिसरातच पीडित मुलीच्या कुटुंबियांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रायव्हर आहे, असे सांगून पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. धमकावणार्‍या व्यक्तीचे नाव दिनकर साळवे असे आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रायव्हर आहे, असे सांगून मंगळवारी पनवेल कोर्ट आवारात समोरासमोर सदर इसमाने पीडित कुटुंबियांना धमकावल्याचे उघड झाले आहे. याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -