घरनवी मुंबईDr.Ambedkar Jayanti Airoli : डोळे दीपले सार्‍यांचे ऐरोलीतील ’ज्ञानस्मारक’ पाहून!

Dr.Ambedkar Jayanti Airoli : डोळे दीपले सार्‍यांचे ऐरोलीतील ’ज्ञानस्मारक’ पाहून!

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जयंती दिनी अनुयायांची गर्दी @ नवी मुंबईत प्रवेश करताच ऐरोली खाडी किनारी दर्शन होते ते ज्ञानस्मारक म्हणून नावाजलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब स्मारकाचे. नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५ येथे उभारलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक देशा परदेशातील विविध स्मारकांपेक्षा अत्यंत आगळे ठरले आहे. डॉ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास पाहण्यासाठी सव्वा दोन वर्षात या स्मारकाला देश परदेशासह २ लाख ५४ हजार ३५४ नागरिक आणि आंबेडकरी अनुयायांनी भेट दिली आहे. या स्मारकाची असणारी वैशिष्टपुर्ण उभारणी आणि आधुनिक सुविधांची ग्रंथ संपदा ही वाचकप्रिय ठरली आहे.

नवी मुंबई/ ज्ञानेश्वर जाधव : ’ज्ञान हीच शक्ती’ या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीवर आधारित महापालिकेने ऐरोली येथे उभारलेले भव्यतम स्मारक हे ’ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे.१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी स्मारकात ज्ञानसूर्याला अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने गर्दी केली होती. ५० मीटर उंचीचा पेनच्या निबच्या आकाराचा भव्य डोम पुतळा विरहीत स्मारक म्हणून नावाजलेल्या या स्मारकातील डॉ.बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्राच्या दालना बरोबरच ई-लायब्रररी, संविधान विशेष कक्ष, ध्यानधारणा केंद्र, दुर्मिळ छायाचित्र आणि पत्राचे दालन पाहून सारेच जण भारवले होते. पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी ज्ञानस्मारकाला भेट देत डॉ.बाबासाहेबांना विनम्रपुर्वक अभिवादन केले. तसेच जयंतीनिमित्त नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

Dr.ambedkar jayanti in airoli ambedkar smarak dpj
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे

२०२१ मध्ये ५ डिसेंबरला स्मारकातील सुविधा लोकार्पण झाल्यानंतर या स्मारकाकडे नागरिकांचा सातत्याने ओढा राहिला असून मागील सव्वा दोन वर्षात २ लाख ५७ हजार ३४० इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी नोंद करून या ठिकाणी भेट देत आगळेवेगळे स्मारक म्हणून या स्मारकाची प्रशंसा केली आहे. डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून कडक उन्हाळा असतानाही साडेआठ हजारहून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट देत डॉ.बाबासाहेबांच्या ज्ञानस्मृतींना अभिवादन केले. डॉ.बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मिळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष छायाचित्र दालन हे स्मारकाचे खास आकर्षण असून त्यामधून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. या दालनात गेल्यानंतर बाबासाहेबांच्या जीवनाची माहिती आणि बाबासाहेब कसे होते?कसे घडले आणि त्यांच्या संवाद या विषयी मनात अभिमान जागृत होते.

- Advertisement -


समृद्ध ग्रंथालय; उद्यानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या नवी मुंबई शहरात पालिकेने अनेक नाविन्यपुर्ण प्रकल्प उभारले आहेत. शहरातील विविध आकर्षक देखण्या वास्तूंमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. स्मारकातील समृध्द ग्रंथालयात ५२८२ इतक्या मोठ्या संख्येने बाबासाहेबांनी लिहिलेले व बाबासाहेबांसह इतर महनीय पुरुषांच्या चरित्रावर आधारित मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध असून ऑडिओ व्हिज्युअल ई-लायब्ररी सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे हे ग्रंथालय म्हणजे सर्वसामान्य वाचकांप्रमाणेच अभ्यासकांसाठीही ज्ञानसमृद्ध असा ठेवा ठरले आहे.


विशेष संविधान कक्ष; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करुन लोकशाहीला बळकट केले आहे. या ग्रंथालयामध्ये संविधान विशेष कक्ष असून त्यामध्ये संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.या ठिकाणी आलेले नागरिक तरुण पिढी इतर देशानीही अनुकरण केलेल्या भारतीय संविधान वाचन करते. ’विशेष संविधान कक्ष’ संविधानाची महती मनामनात रुजवण्यासाठी उपयोगी आहे. या ठिकाणी होणार्‍या ’विचारवेध’ व ’जागर’ ह्या व्याख्यानशृंखला वाचन संस्कृतीचा व्यापक प्रसार करत आहे.

- Advertisement -


ग्रंथ संपदेतून नवा उगम ; या स्मारकाला राज्यातील विविध जिल्ह्यांप्रमाणेच देशाच्या विविध प्रांतांतून तसेच परदेशातूनही नागरिक या स्मारकाचे वेगळेपणे अनुभवण्यासाठी भेट देतात.त्यांना बाबासाहेबांच्या व्यक्ती महत्वाची ओळख व्हावी त्याच प्रमाणे महामानवाचे विचार मंथन व्हावे या करीता ग्रंथालय उभारण्यात आले आहे.यात ५२८२ ग्रंथ साठा आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे दर्शन होते.


ई-ग्रंथालय : आजच्या संगणीय युगात नव्या पिढीला काही तरी वेगळे देण्याच्या दृष्टीने बदत्या काळानुसार या स्मारकात ई ग्रंथालय कक्ष उभारण्यात आला आहे.यात डॉ.आंबेडकरांबद्दलची माहिती व्हिडीओ, ऑडियो, पीडीएफ, पीपीटी या द्ृकश्राव्य माध्यमांचा वापर केला आहे. ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररी ही सर्वांनाच वाचनाचे महत्व पटवून देते.आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची संधी देणारा अत्याधुनिक होलोग्रफिक प्रेझेंटेशन शो भारावून टाकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -